कस्तुरीमृग - एक लोभस हरीण

कस्तुरीमृगाची उंची फक्त २० इंच एवढी असते यावरून हे हरीण किती छोटे असते याची कल्पना येते. कस्तुरी मृगाचे नाव हे त्याच्याकडील कस्तुरी नामक सुगंधी स्त्रावामुळे आहे व अनेक म्हणी व लोककथांमध्ये कस्तुरीची कथा आपण ऐकली असते.

कस्तुरीमृग - एक लोभस हरीण
कस्तुरीमृग

हरीण या खुरधारी वर्गातील शाकाहारी प्राण्याचे दोन मुख्य प्रकार असून त्यातील एक प्रकार म्हणजे कुरुंग हरीण (Antelope) व दुसरा प्रकार म्हणजे सारंग हरीण (Cervidae). हरिणाच्या या दोन मुख्य प्रकारांपैकी सारंग या प्रकारातील एक आगळे वेगळे हरीण म्हणजे कस्तुरी मृग.

कस्तुरी मृगास इंग्रजीमध्ये Musk Deer असे नाव असून हे हरीण बहुतांशी हिमालय पर्वताच्या उंच भागात आढळतात. सारंग कुळातील असले तरी कस्तुरीमृग हे पूर्णपणे सारंग कुलातीलही वाटत नाहीत व कुरंग कुळातीलही वाटत नाहीत. यांचे रूप एखाद्या लहान बकरीसारखे असते. कस्तुरीमृगास शिंगे नसतात व यांच्या वरील जबड्यातील सुळ्यांचे दात जबड्यातून खाली आलेले असतात.

बकऱ्यांना व कुरुंग कुळातील हरणांना असे सुळ्याचे दात नसून ते सारंगांना असतात मात्र सारंगांचे दात सुद्धा बाहेर आलेले नसतात. कस्तुरीमृगाचे केस चडचडीत आणि लांब असतात आणि पार्श्वभागावरील केस एवढे लांब असतात की त्यामध्ये कस्तुरीमृगाची शेपटी लपली जाते. 

कस्तुरीमृगाची उंची फक्त २० इंच एवढी असते यावरून हे हरीण किती छोटे असते याची कल्पना येते. कस्तुरी मृगाचे नाव हे त्याच्याकडील कस्तुरी नामक सुगंधी स्त्रावामुळे आहे व अनेक म्हणी व लोककथांमध्ये कस्तुरीची कथा आपण ऐकली असते.

कुरंग हरिणांच्या सुंगध ग्रंथी या त्यांच्या मुखाजवळ असतात मात्र कस्तुरीमृगाच्या सुगंधग्रंथी या त्यांच्या पोटाखाली बेंबीजवळ असतात व या ग्रंथी फक्त नरांमध्येच असतात. कस्तुरीमृगाच्या ग्रंथीतून जो स्त्राव येतो तो प्रथम त्याच्या मूत्रात मिसळलेला असतो मात्र काही वेळाने मूत्र वळून फक्त कस्तुरीचाच सुगंध राहतो. या कस्तुरीच्या सुगंधानेच मादी ही नाराकडे आकर्षिली जाते आणि नर व मादीचे मिलन होते. कस्तुरीमृग हे बऱ्याचदा एकटे व प्रसंगी जोडीने राहतात. 

कस्तुरीमृग हे हरीण प्रामुख्याने नेपाळ, काश्मीर व सिक्कीम या हिमालयातील प्रदेशात पाहावयास मिळतात. हिमालय पर्वताच्या खालील भागात सात हजार फुटापर्यंत साधी झाडी असून तिच्यावरील प्रदेशात देवदाराद्य गणांतील वृक्ष आहेत आणि त्याहून अधिक उंचीवर भूर्जवृक्ष आहेत. याहून अधिक उंचीवर फारशी झाडे पाहावयास मिळतात नाही. कस्तुरीमृग हे सहसा भुर्जवनाच्या प्रदेशात किंवा त्यावरही पाहावयास मिळतात.  कस्तुरीमृगाच्या निवासाचे वैशिट्य म्हणजे ते जमिनीत खळगे करून त्यात लपून राहतात आणि त्यांचा उदरनिर्वाह गवत, दगडफूल झाडांचा पाला आणि फुलांवर चालतो.

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा