सांबर हरिणाची माहिती

सांबरांचे मुख्य अन्न म्हणजे गवत, झाडांचा पाला आणि फळे हे आहे. सांबार सहसा दिवसा ढवळ्या बाहेर पडत नाहीत व फक्त रात्रीच बाहेर पडतात अन्यथा दिवसा ती दाट झाडीत लपून राहतात.

सांबर हरिणाची माहिती
सांबर

भारतात आढळणारी हरिणाची अर्थात मृगाची मुख्य जात म्हणजे सांबर. सांबर हरिणाचे शास्त्रीय नाव Cervix unicolour असे असून भारतात आढळणाऱ्या हरीणांमध्ये आकाराने सांबर सर्वात मोठे हरीण आहे. सांबराची उंची ५५ इंच असून शिंगांची उंची २६ इंच असते तर पूर्ण वाढलेल्या नराचे वजन ५०० पौंडांपर्यंत भरते.

सांबर हरिणाचे केस हे सामान्य हरिणाच्या तुलनेत जास्त भरड असतात. सांबर नरांना आयाळ असून त्यांचा रंग पिवळसर पिंगट असतो व माद्यांचा रंग नरांच्या तुलनेत फिका असतो. सांबार हरीण वृद्ध झाले की त्याचा रंग काळसर होतो. सांबार हरीण भारतात अनेक ठिकाणी पाहण्यात येत असले तरी पूर्वी नर्मदा आणि तापी या नद्यांच्या काठावरील प्रदेशावर सांबरांची संख्या विपुल होती.

सांबरांचे मुख्य अन्न म्हणजे गवत, झाडांचा पाला आणि फळे हे आहे. सांबार सहसा दिवसा ढवळ्या बाहेर पडत नाहीत व फक्त रात्रीच बाहेर पडतात अन्यथा दिवसा ती दाट झाडीत लपून राहतात. सांबरांच्या दृष्टीपेक्षा त्यांची गंध क्षमता जास्त तीक्ष्ण असते आणि शत्रूपासून बचाव करण्यासाठी ते या गंधक्षमतेचा अधिक प्रमाणात वापर करतात.

सांबर हरीण हिवाळा, उन्हाळा, पावसाळा इत्यादी ऋतूंनुसार वेगवेगळ्या स्थळी स्थलांतर सुद्धा करतो. उन्हाळा व पावसाळा सांबर समूहाने एकत्र फिरतात व हिवाळ्यात एखाद्या दरीत उतरतात मग यातील नर आपली जागा ठरवून घेतो आणि मग या जागेवर तो दुसऱ्या नरास येऊ देत नाही. जर दुसरा नर तेथे आलाच तर दोघांमध्ये झगडा होतो आणि झगड्यात जिंकलेल्या नरास ती जागा प्राप्त होते.

विजयी नरास मग कळपातील अनेक माद्या प्राप्त होतात. नर सांबरास मद आला की त्याच्या शरीरातून एक विशिष्ट गंध द्रवतो व त्या गंधाने माद्या नाराकडे आकर्षित होतात व तो त्यांच्यासहित प्रणयक्रीडा करतो मात्र या माद्यांची संख्या एका कळपात बाराच्या वर जात नाही. साधारणतः एक दोन महिन्यांत सर्व माद्यांना गर्भ राहिला की मग नर त्यांना सोडून जातो व या बारा माद्यांपैकी एक मादी कळपाचे नेतृत्व स्वीकारते. कालांतराने माद्यांना जी पिल्ले होतात त्यांना पाडसे असे म्हणतात. पाडसे मोठी होईपर्यंत ती आईसोबतच राहतात व एकदा का ती प्रौढ झाली की त्यातील फक्त नर वेगळे होऊन माद्या त्याच कळपाचा भाग बनतात.

सांबर हरिणाचा सर्वात आकर्षक अवयव म्हणजे त्याचे शिंग. हे शिंग आपल्याकडे सांबरशिंग या नावाने ओळखले जाते. ही शिंगे म्हणजे त्यांच्या बचावासाठी निर्माण झालेली नैसर्गिक शस्त्रेच आहेत व शिंगांचा वापर ते शत्रूपासून बचाव करण्यासाठी अथवा दोन सांबरांत जी लढाई होते त्यासाठी प्रामुख्याने वापरतात. मुळात सांबारशिंग हे एक हाड असून त्यावर वेगळे कवच नसते. शिंग वाढत असताना मात्र त्यावर त्वचेचे आवरण असते आणि त्यातून रक्तवाहिन्या वर गेलेल्या असतात मात्र एकदा का शिंगांची वाढ पूर्ण झाली की त्या रक्तवाहिन्या बंद होऊन वरील त्वचा सुरकुतु लागते मग ती सुरकुतलेली त्वचा काढून टाकण्यासाठी सांबर आपली शिंगे एखाद्या झाडावर जोरात घासतात. मात्र पूर्ण वाढ झालेली शिंगेही कालांतराने गळून पडतात व पुन्हा उगवतात. साधारणतः उन्हाळ्यात ही शिंगे गळून पुन्हा उगवण्याची प्रक्रिया सुरु होते आणि हिवाळ्यात शिंगे पूर्णपणे उगवून पूर्ण होतात.

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press