रामेश्वर पंचायतन कळंबस्ते
कसबा संगमेश्वर पासून जेमतेम ३ किमी वर वसले आहे कळंबस्ते गाव. छोटेसे टुमदार गाव आणि गावाला काही वाड्या. त्यातलीच एक आहे साटलेवाडी. इथे निसर्गरम्य अशा शांत ठिकाणी वसले आहे रामेश्वर देवालय आणि पंचायतन.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेला संगमेश्वर परिसर सगळा पायाखालून घालायचा तर एक अख्खे वर्ष तरी लागेल. इतकी विविधता आणि खजिना या परिसरात दडलेला आहे. प्रत्येक वेळी नवनवीन ठिकाणे समजणे आणि ती बघायला जाणे हे तर आता नित्याचे झाले आहे.
कसबा संगमेश्वर हा परिसर मुळातच सह्याद्रीने आपल्या कवेत घेतलेला आहे. शृंगारपुर, नायरी-तिवरे ही ठिकाणे तर अगदी सह्याद्रीच्या कुशीत आणि जवळजवळ पायथ्याशी जाऊन भिडलेली आहेत. सह्याद्रीने सर्व बाजूंनी या प्रदेशाला जणू वेढून टाकलेले दिसते. अशाच रम्य प्रदेश एक सुंदरसे देवालय वसलेले आहे. रामेश्वर पंचायतन.
मुळातच पंचायतन मंदिरे संख्येने कमी आढळतात, त्यातही कोकणात इतक्या आडबाजूला एक सुंदर पंचायतन असणे ही खरच भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल.
कसबा संगमेश्वर पासून जेमतेम ३ किमी वर वसले आहे कळंबस्ते गाव. छोटेसे टुमदार गाव आणि गावाला काही वाड्या. त्यातलीच एक आहे साटलेवाडी. इथे निसर्गरम्य अशा शांत ठिकाणी वसले आहे रामेश्वर देवालय आणि पंचायतन. मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत सुंदर पायवाटेने जावे लागते.
हे मंदिर खूप मोडकळीला आलेले होते. मात्र स्थानिक पत्रकार श्री सत्यवान विचारे आणि श्री जे डी पराडकर या मंडळींनी या मंदिराचा जीर्णोद्धार करायचे मनावर घेतले. समस्त साटलेवाडीच्या ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दिला. गावातल्या प्रत्येक घरातून वर्गणी गोळा झाली. अगदी साटलेवाडीच्या माहेरवाशिणीसुद्धा यात हिरीरीने पुढे आल्या. आणि एक सुंदर असे देवालय पुन्हा एकदा उभे राहिले. ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय या प्रसंगावरून घेता येतो.
मुळात हे मंदिर आहे साधारण १७८० च्या आसपास बांधलेले. या गावचे गृहस्थ श्री गानू हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सेवेत होते. अहिल्याबाईंचा दानशूरपण, धार्मिकवृत्ती गानू बघून होते.
कोकणातल्या आपल्या गावीसुद्धा एखादे शिवमंदिर बाधायचे त्यांच्या डोक्यात आले. त्यांनी अहिल्याबाईंकडे मदत मागितली. अहिल्याबाईंनी सढळ हाताने या कार्यासाठी मदत केली. गानूंनी मग आपल्या या मूळ गावी नुसते शिवालय नाही तर शिवपंचायतन उभारले.
गाभाऱ्यात काळ्या पाषाणाची शिवपिंड आहे, तर तिच्या मागे असलेल्या कोनाड्यात महिषासुरमर्दिनीची सुरेख मूर्ती ठेवलेली आहे. या पंचायतनातील मूर्ती मध्यप्रदेशमधून घोड्यावरून आणल्या गेल्या. अतिशय सुंदर आणि वेगळ्या धाटणीच्या या संगमरवरात घडवलेल्या मूर्ती बघण्याजोग्या आहेत. शिवमंदिरातील नंदी आणि त्यावर केलेली देखणी कलाकुसर आपल्याला थक्क करून सोडते.
मंदिराच्या आवारात दोन डौलदार दीपमाळा आहेत. समस्त कळंबस्ते गावचे हे भूषण तर आहेच पण हा एक अनमोल ठेवा इतक्या आडबाजूला शांत निवांत परिसरात वसलेला आहे. मंदिराच्या मागच्याच बाजूला चिरेबंदी सुंदर अशी बारव आहे. त्यात असलेले पाणी आणि त्या पाण्यात पडलेले आजूबाजूच्या झाडांचे प्रतिबिंब फारच मोहक असते.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |