कुकडेश्वर मंदिर जुन्नर

कुकडेश्वर मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे चुन्याचा वापर न करता एकावर एक असे पाषाण रचून या मंदिराची उभारणी केली गेली आहे. 

कुकडेश्वर मंदिर जुन्नर

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर हे मंदिर भारतीय स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

कुकडेश्वर मंदिर जुन्नर शहरापासून अदमासे २० किलोमीटर अंतरावरील पूर या गावी असून या ठिकाणी कुकडी या नदीचा उगम होतो.

कुकडेश्वर या मंदिराची निर्मिती बाराव्या शतकातील मानले जाते व मंदिराचे सुंदर स्थापत्य पाहून याची प्रचिती सुद्धा येते.

मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे चुन्याचा वापर न करता एकावर एक असे पाषाण रचून या मंदिराची उभारणी केली गेली आहे. 

मुख्य मंदिराच्या प्रांगणात अजून एक वैशिष्ट्यपूर्ण असे मंदिर दिसून येते. या मंदिराच्या गर्भगृहात मुख्य देवता असून बाहेरील दोन बाजूंस उग्र  स्वरूपातील दोन मूर्ती कोरल्या गेल्या आहेत.

कुकडेश्वर मंदिराच्या द्वार शाखेवर सूर्य गणेशपट्टी असून दाराच्या दोन्ही बाजूना  द्वारपाल कोरलेले आहेत. 

कुकडेश्वर मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे तीन भाग असून मंदिराच्या आतील खांब व भिंतीवरील कोरीव काम अतिशय चित्तवेधक आहे. 

मंदिराच्या सभागृहावर फुलांची सुंदर अशी नक्षी दिसून येते. 

मंदिराच्या प्रत्येक भागात गंधर्व, यक्ष, किन्नर यांची कोरीव शिल्प दिसून येतात. 

काही खांबांवर सुरसुंदरी, गणेश, शिव, पार्वती, नर्तिका, वादक यांची सुरेख शिल्पे कोरली गेली आहेत.

मंदिराच्या गर्भगृहात पितळी आच्छादन असलेले सुंदर असे शिवलिंग आहे. 

महाराष्ट्रातील असंख्य शिल्पस्थापत्य वैभवांपैकी पैकी एक असलेले कुकडेश्वर मंदिर एकदा तरी पाहायलाच हवे.