मधमाशी - एक उपयुक्त कीटक

मधमाशीपासून मिळणारे मध मनुष्यास उपयुक्त असले तरी मधमाशी पासून आणखी एक पदार्थ निर्माण होतो व तो पदार्थ म्हणजे मेण.

मधमाशी - एक उपयुक्त कीटक

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

जगात जे असंख्य कीटक आहेत त्यापैकी एक म्हणजे मधमाशी. मधमाशीचा समावेश हा उडणाऱ्या कीटकांमध्ये होतो.

मधमाशा या समूहप्रिय असून त्या त्यांच्या निवास्थानास पोळा असे म्हणतात. या कीटकास मधमाशी हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे त्यांचे मुख्य कार्य हे मध गोळा करणे आहे.

मधमाशी हे मध प्रामुख्याने फुलांमधून मिळवते. मधमाशी हा खूप मेहनती कीटक असून त्यांचा पूर्ण समूह अतिशय शिस्तबद्ध काम करत असतो.

मध मिळवण्यासाठी मधमाशी ही प्रथम फुलावर बसून आपल्या जिभेद्वारे फुलांमधील रस शोषून घेते.  रसासोबत फुलांच्या मध्यभागी असलेला भाग सुद्धा मधमाशी काढून घेते.

या भागास काढल्यावर मधमाशी प्रथम आपल्या पायांनी त्यास साफ करते आणि दोन छोट्या गोळ्या करून आपल्या दोन्ही पायांमध्ये पकडते. अशा प्रकारे रस आणि फुलांच्या मधील भाग जमा करून मधमाशी आपल्या पोळ्याकडे जाते. 

येथे आल्यावर फुलांच्या मधल्या भागात ती थोडा रस मिसळते आणि तेच अन्न म्हणून वापरते. या अन्नाला मधमाशीची भाकरी म्हणतात. 

कालांतराने याच फुलांच्या रसाचे सुमधुर अशा मधात रूपांतर होते.

मधमाशी हे मध स्वतःचे अन्न म्हणून जमा करीत असली तरी मनुष्यप्राणी सुद्धा हे मध काढून घेऊन त्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर करतो. 

मधमाशीपासून मिळणारे मध मनुष्यास उपयुक्त असले तरी मधमाशी पासून आणखी एक पदार्थ निर्माण होतो व तो पदार्थ म्हणजे मेण.

मधमाशांच्या शरीरातून निघालेला मळ म्हणजे मेण. मेणाचा वापर आपल्याकडे अनेक कारणांसाठी करण्यात येतो.

मधमाशा या समुहप्रिय असल्याने त्या समूहातच राहतात. मधमाशांचा एका पोळ्यात अदमासे तीस हजार मधमाशा राहू शकतात.

या पोळ्यात एकूण तीन प्रकारच्या मधमाशा असतात. हे तीन प्रकार म्हणजे राणी मधमाशी, पुरुष मधमाशी आणि श्रमिक मधमाशी असे आहेत.

एका पोळ्यात एकाच राणी मधमाशी असते व ती सर्वांची प्रमुख असते. राणी मधमाशीचे मुख्य काम म्हणजे अंडी देऊन मधमाशांची संख्या वाढवणे.

पुरुष मधमाशा बऱ्याच असतात मात्र त्यांना फक्त प्रजोत्पादनासाठी वापरले जाते. इतर कोणतेही काम ते करत नाहीत. पुरुष मधमाशांना नांगी पण नसते.

श्रमिक मधमाशा मात्र प्रचंड मेहनत करतात. बाहेर जाऊन मध गोळा करणे, समूहाचे रक्षण करणे, लहान मधमाशांचा सांभाळ करणे अशी अनेक कामे त्या करतात.

मधमाशांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्याकाळात अनेक राज्यव्यवस्था चालत. मनुष्यास आवश्यक असे मध आणि मेण निर्माण करणारी मधमाशी एक अतिशय उपयुक्त असा कीटक आहे.