सुएझचा कालवा - एक जगप्रसिद्ध कृत्रिम कालवा
सुएझचा कालवा तयार करण्याच्या कामी त्याकाळी दोन कोटी पौंड इतका खर्च आला होता आणि अगणित मेहनतीनंतर १८६९ साली सुएझच्या कालव्याचे काम पूर्ण झाले.

आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने जी अचाट कृत्ये केली आहेत त्यापैकी एक म्हणजे सुएझचा कालवा. सुएझचा कालवा हा एक जगविख्यात मानवनिर्मित कालवा असून या कालव्यामुळे युरोप आणि भारत यांच्या दळणवळणात अभूतपूर्व क्रांती घडून आली तेव्हा या लेखात सुएझच्या कालव्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
पूर्वी योरोपमधील लंडन येथून भारतातील मुंबईला येण्यासाठी केप ऑफ गुड होप ला वळसा घालून यावे लागत असे व हे अंतर तब्बल अठरा हजार किलोमीटरचे होते त्यामुळे या मार्गास पर्यायी मार्ग शोधणे तयार झाले होते मात्र हे काम निश्चित सोपे नव्हते कारण कमी अंतराचा नवा मार्ग निर्माण करायचा म्हणजे तो कृत्रिमरित्याच तयार करणे भाग होते व या कामात प्रचंड खर्च व श्रम लागणार होते.
युरोपमधील अनेक लोक नव्या मार्गाचा विचार करीत असताना एक प्रसिद्ध फ्रेंच अभियंता फर्डिनांड डी लेसेप्स याने हे आव्हान स्वीकारले मात्र यावेळी अनेकांनी त्याच्या कार्यक्षमतेवर शंका घेतली मात्र फर्डिनांड डी लेसेप्स याने हे आव्हान फक्त स्वीकारलेच नाही तर ते पूर्ण करण्याची तयारी सुद्धा सुरु केली.
फर्डिनांड डी लेसेप्स याने भारत व युरोप मधील दळणवळण सोयीचे व्हावे म्हणून कालवा निर्मितीचा प्रस्ताव ठेवला आणि यासाठी भूमध्य समुद्रास तांबड्या समुद्रास एका कालव्याने जोडून हा जलमार्ग तयार करण्याची योजना बनवली आणि इजिप्त मध्ये त्याने या कालव्याच्या निर्मितीची सुरुवात केली.
या कालव्यास सुएझ हे नाव पडण्याचे कारण म्हणजे इजिप्त देशातील सुएझ या शहराच्या बाजूने हा कालवा गेला आहे.
कालवा निर्माण करण्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे प्रचंड मनुष्यबळ आणि खर्च लागणार होते त्यामुळे फर्डिनांड डी लेसेप्स याने तब्बल वीस हजार माणसांचे मनुष्यबळ तयार करून कालव्याचे काम सुरु केले आणि वाटेतील हजारो टेकड्या फोडून आणि वाळू उपसून कालवा तयार करण्यात आला.
सुरुवातीस या कालव्याची लांबी १६४ किलोमीटर असून खोली आठ मीटर होती मात्र कालांतराने त्यात वाढ करून कालव्याची लांबी १९३ किलोमीटर, खोली २४ मीटर आणि रुंदी २०५ मीटर एवढी केली गेली.
सुएझचा कालवा तयार करण्याच्या कामी त्याकाळी दोन कोटी पौंड इतका खर्च आला होता आणि अगणित मेहनतीनंतर १८६९ साली सुएझच्या कालव्याचे काम पूर्ण झाले.
हा कालवा तयार झाल्यामुळे युरोपातील राष्ट्रांचा पूर्वेकडील अनेक देशांशी व्यापार सुरळीत होण्यास अत्यंत मदत झाली त्यामुळे संपूर्ण युरोप खंडातून फर्डिनांड डी लेसेप्स याची वाहवा करण्यात आली.
सुएझच्या कालव्याचा सर्वात मोठा फायदा हा झाला की पूर्वी युरोपमधून भारतात जलमार्गाने यावयाचे असल्यास केप ऑफ गुड ऑफ ला वळसा घालून अठरा हजार मैलांचा प्रवास करायला लागायचा मात्र सुएझच्या कालव्यामुळे हे अंतर फक्त दहा हजार किलोमीटर झाले त्यामुळे अदमासे आठ हजार किलोमीटरचे अंतर या कालव्यामुळे वाचले.
सुएझचा कालवा लांब आहेच मात्र त्याची रुंदी सुद्धा मोठी असल्याने या कालव्यातून मोठ्या आकाराच्या बोटी सुद्धा सहज येऊ शकत त्यामुळे युरोप व भारत यांच्यातील व्यापारास बळकटी मिळून दोन्ही बाजूंचा व्यापार वाढला आणि देशांचा आणि पर्यायाने तेथील जनतेचा विकास झाला.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |