टाकळा - एक बहुगुणी वनस्पती

टाकळा ही वनस्पती प्रामुख्याने कोकणप्रांती अधिक प्रमाणात पाहावयास मिळते कारण त्याठिकाणी पाऊस अधिक असतो.

टाकळा - एक बहुगुणी वनस्पती

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आपल्या भारतात औषधी महत्व असलेल्या ज्या असंख्य वनस्पती आहेत त्यांपैकी एक म्हणजे टाकळा. टाकळा ही वनस्पती पावसाळ्यात बहरणाऱ्या वनस्पतींपैकी एक असून ती सूर्यविकासिनी वनस्पती म्हणून सुद्धा ओळखली जाते. सूर्यविकासिनी वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतीची पाने सूर्योदयाच्या वेळी उघडतात व सूर्यास्ताच्या वेळी बंद होतात अशी वनस्पती.

फार पूर्वी जेव्हा घड्याळे फारशी प्रचारात आली नव्हती आणि पावसाच्या दिवसात सूर्य जेव्हा ढगांच्या आड दडलेला असे त्यावेळी टाकळ्याच्या वनस्पतीवरून सूर्योदय व सूर्यास्ताची वेळी पाहिली जात असे.

टाकळा ही वनस्पती प्रामुख्याने कोकणप्रांती अधिक प्रमाणात पाहावयास मिळते कारण त्याठिकाणी पाऊस अधिक असतो. पावसाळ्यात कोकणात जागोजागी टाकळ्याच्या वनस्पती फुललेल्या दिसून येतात.

पावसाळ्यात कोकणात टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी प्रामुख्याने भोजनात वापरली जाते आणि टाकळा आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. टाकळ्याचे सेवन केल्यास कफ, कुष्ठ, कृमी, दमा, ज्वर, मेह, खोकला आदी आजारांपासून सुटका मिळते.

टाकळ्याचे बी, करंजाचे बी आणि कोष्ठ हे गोमूत्रांत वाटून त्यांचा लेप केल्यास कुष्ठ रोगाचा नाश होतो असे उल्लेख जुन्या वैद्यक ग्रंथांत आढळतात.

शरीरातील सुस्ती घालवून रक्ताची वृद्धी करणे आणि रात्रीच्या जागरणापासून जे नुकसान होते ते कमी करण्यास टाकळा ही वनस्पती अतिशय उपयोगी आहे.

पावसाळ्यात टाकळा हा भाजीसाठी उपयोगात आणला जात असला तरी कार्तिक आणि मार्गशीर्ष या महिन्यांच्या दरम्यान टाकळ्याची झाडे सुकू लागतात त्यावेळी ही झाडे औषधे अथवा अर्क बनवण्याच्या कामी उपयोगात आणली जातात आणि औषधांशिवाय या वनस्पतीच्या झाडांची कोडे ही सरपणाच्या कामी सुद्धा उपयोगी येतात.

टाकळा ही खऱ्या अर्थी एक बहुगुणी वनस्पती आहे.