किल्ले विसापूर - मावळातील एक अभेद्य दुर्ग

विसापूरचा किल्ला प्राचीन काळापासून वैभवशाली असून पूर्वी हा किल्ला वास्तू व बांधकामांनी परिपूर्ण होता.

किल्ले विसापूर - मावळातील एक अभेद्य दुर्ग

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोहगड व विसापूर ही एक प्रसिद्ध दुर्गजोडी. 

लोहगड व विसापूर हे किल्ले प्राचीन काळापासून आंदर मावळ व नाणे मावळ या दोन मावळांचे रक्षण करीत आले आहेत. 

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भाजे लेणी या किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध करतात.

विसापूरचा किल्ला प्राचीन काळापासून वैभवशाली असून पूर्वी हा किल्ला वास्तू व बांधकामांनी परिपूर्ण होता.  

मात्र काळाच्या ओघात अनेक वास्तू नष्ट झाल्या.

विसापूर किल्ल्याचे दर्शन घेताना या भग्न वास्तू आपणास त्यांचा इतिहास कथन करण्यासाठी आतुर असतात. 

किल्ल्याच्या माथ्यावर असलेले एक खांबटाके दुर्गप्रेमींचे आकर्षण आहे.

खडकात सलग खोदकाम करून बांधलेल्या या वास्तूमध्ये प्रवेश करताना बांधीव दरवाजे लागतात.

सदर वस्तूचा उपयोग निवास्थान अथवा पाण्याचे टाके म्हणून इतिहासकाळात केला गेला असावा.

विसापूर किल्ल्यावर एक सुंदर असे शिवमंदिर असून मंदिराच्या प्रांगणात शिवाचे वाहन असलेला नंदी दिसून येतो. 

मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाचे लिंग स्थापित आहे.

या शिवमंदिरासमोर एक दीपमाळ असून दीपमाळेच्या खाली नाग, गणेश व हनुमान या देवतांच्या मूर्ती स्थापित केलेल्या दिसून येतात.

लोहगड किल्ल्याचा जुळा भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेला विसापूर हा किल्ला प्रत्येक शिवप्रेमीने एकदातरी पाहायलाच हवा.