महाकालेश्वर मंदिर उज्जैन - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक
महाकालेश्वर मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बारा ज्योतिर्लिंगामध्ये हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे.

भारतातल्या प्रसिद्ध अशा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे मध्यप्रदेशातल्या उज्जैन येथील श्री महाकालेश्वर.
क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेले श्री महाकालेश्वर हे शिवमंदिर भारतातील प्रमुख धार्मिक स्थानांपैकी एक आहे.
महाकालेश्वर मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बारा ज्योतिर्लिंगामध्ये हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे.
महाकालेश्वर या स्थानाचे महत्त्व मोठे आहे कारण साक्षात महादेवाने महाकालेश्वराचे उग्र रूप धारण करून या ठिकाणी एका राक्षसाचा वध केला होता व त्यामुळे या शिवलिंगास महाकालेश्वर या नावाने ओळखले जाते.
महाकालेश्वर मंदिराच्या मुख्य गर्भगृहात महाकाळेश्वराचे विशाल असे नाग वेष्टित स्वयंभू शिवलिंग आहे.
महाकालेश्वराच्या लिंगाचे वर्णन रामायण, महाभारत, पुराणे आणि अनेक प्राचीन काव्यांत आले आहे.
प्राचीन काळी हे मंदिर तब्बल १२१ गज उंच असून त्यास १२१ खांब होते आणि मंदिराचे गर्भगृह रत्नजडित होते.
अकराव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार राजा भोज याचा उत्तराधिकारी उदयदित्त याने केला होता.
महाकालेश्वर मंदिराच्या प्रांगणा निळकंठ, स्वप्नेश्वर, एकाधिश्वर, अनादिकल्पेश्वर आणि वृद्धकालेश्वर इत्यादी मंदिरे आहेत.
महाकालेश्वर या ठिकाणी साक्षात भगवान शंकर व विष्णु यांची सुद्धा भेट घडली होती व दोघांनी एकमेकांची बेलाची पाने वाहून पूजा केली होती.
महाकालेश्वर मंदीराचे प्रांगण अत्यंत विशाल असून त्याचे एकूण तीन खंड आहेत.
गर्भगृहात महाकालेश्वर, मध्य खंडात ओंकारेश्वर, आणि वरील खंडात नागचंद्रेश्वर हे मंदिर आहे.
मंदिरासमोर कोटीतीर्थ सरोवर आणि गणपतीचे मंदिर असून पंचमुखी हनुमानाची सप्तधातूची मूर्ती आहे.
काळावर विजय प्राप्त करणारी देवता म्हणून महाकालेश्वर प्रसिद्ध असल्याने अनेक भाविक आपल्यावरील संकटांचे निवारण व्हावे या करिता श्री महाकालेश्वराच्या दर्शनास मनोभावे येत असतात.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |