गोधनेश्वर मंदिर उधेवाडी राजमाची
गोधनेश्वर मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे पाषाणात करण्यात आलेले असून अभ्यासकांच्या मते हे हेमाडपंती शैलीतील बांधकाम आहे.

पुणे जिल्ह्यातील राजमाची हा किल्ला एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे.
राजमाची परिसर पूर्वी कोकणचा दरवाजा म्हणून ओळखला जात असे.
याच राजमाची परिसरातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे गोधनेश्वर हे प्राचीन असे शिवमंदिर.
राजमाची किल्ल्याच्या माचीवर उधेवाडी हे गाव आहे. उधेवाडी गावाच्या दक्षिणेस समुद्रसपाटीपासून ६०० मीटर उंचीवर उदयसागर हा भव्य तलाव आहे.
हा तलाव राजमाची किल्ला परिसरातील वस्तीच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत असावा.
या उदय सागर तलावाच्या शेजारी व पश्चिम दिशेस गोधनेश्वर हे पुरातन शिवमंदिर आहे.
मूळ जमिनीच्या आत काही फूट खोदकाम करून हे मंदिर बांधण्यात आल्याचे जाणवते.
मंदिराबाहेर एक दीपमाळ व समाधी सदृश्य शिळा दृष्टीस पडते.
गोधनेश्वर मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे पाषाणात करण्यात आलेले असून अभ्यासकांच्या मते हे हेमाडपंती शैलीतील बांधकाम आहे.
मंदिराच्या समोरच एक कुंड असून त्यामध्ये गोमुखातून सतत पाणी पडत असते. असे म्हणतात कि हे पाणी गोमुखातून बाराही महिने वाहत असते.
मंदिराच्या सभामंडपास भिंती नसून फक्त खांबांच्या आधारावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. या खांबांची संख्या २५ हून अधिक असावी.
गर्भगृहाच्या दरवाज्यावर गणेशपट्टी असून पाषाणी भिंतींनी वेष्टीत अशा गर्भगृहात गोधनेश्वराचे जागृत शिवलिंग आहे.
गोधनाचा ईश्वर म्हणून या देवतेस गोधनेश्वर असे नाव मिळाले असावे.
मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील देवळीत एक गणेश मूर्ती सुद्धा पहावयास मिळते.
मंदिराचा परिसर दाट अशा वनराईने आच्छादलेला असून येथील हवा सर्व ऋतुत आल्हाददायक असते.
राजमाची किल्ल्यास भेट देणार्यांनी निसर्गाच्या कुशीत लपलेले गोधनेश्वर मंदिर एकदातरी पाहायलाच हवे.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |