अक्षय्य तृतीया - एक शुभमुहूर्त
हिंदू धर्मात एकूण साडेतीन शुभ मुहूर्त आहेत त्यापैकी अर्धा शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. शुभ मुहूर्तांवर एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करण्याची परंपरा असते आणि अक्षय्य तृतीयेची महती म्हणजे या दिवशी केलेले शुभ कार्य अक्षय्य राहते म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही.

हिंदू धर्मात एकूण साडेतीन शुभ मुहूर्त आहेत त्यापैकी अर्धा शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. शुभ मुहूर्तांवर एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करण्याची परंपरा असते आणि अक्षय्य तृतीयेची महती म्हणजे या दिवशी केलेले शुभ कार्य अक्षय्य राहते म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही.
अक्षय्य तृतीयेच्या या विशेषामुळे अनेकजण या दिवशीच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. शेतकरी बांधवांच्या कामाची सुरुवातही याच दिवसापासून होते. शेतातील झुडुपे काढणे, नांगरणी, खत, बी तयार करणे इत्यादी अनेक कार्ये सामान्यतः शेतकरी या दिवसापासून सुरु करतात.
अक्षय्य तृतीये बद्दल एक कथा सांगितली जाते. प्राचीन काळी शाकल नावाच्या एका नगरात धर्म नावाचा वाणी राहत होता. तो आपला व्यवसाय सांभाळून अनेक दानधर्म सुद्धा करत असे. एकदा अक्षय्य तृतीयेच्या दिवसाची महती त्यास समजली तेव्हापासून त्याने दर अक्षय तृतीयेस नदीत अंघोळ करून पितृ तर्पण व ब्राह्मणास धान्याने भरलेला घट देण्याचा उपक्रम सुरु केला. त्याचा मृत्यू झाल्यावर पुढील जन्मात त्याच्या पूर्वजन्मातील पुण्यामुळे त्यास राजाचा जन्म प्राप्त झाला. राज्यपद सांभाळत असतानाही त्याने भरपूर दानधर्म केला त्यामुळे त्यास कधीही काही कमी पडले नाही. असे हे अक्षय्य तृतीयेचे पौराणिक महत्व.
अक्षय्य तृतीया ही वैशाख शुद्ध तृतीयेस येते. असे म्हणतात की चैत्र शुद्ध तृतीयेस माहेरी आलेली गौरी या दिवशी पुन्हा आपल्या घरी जाते. त्यामुळे या दिवशी हळदीकुंकू घेण्यासाठी घरोघरी जातात. पूर्वी खेडोपाड्यात स्त्रिया अक्षय्य तृतीयेचा उत्सव खूप उत्साहात साजरा करीत. प्रातःकाळी उठून गाणी गात गौरी विसर्जन करून भोजन करून दुपारी झाडाच्या फांद्यांना पाळणा बांधून झोके घेत गाणी गायली जात.
अक्षय्य तृतीयेचे एक आणखी महत्व म्हणजे खरं तर हा एक श्राद्ध दिवस सुद्धा आहे. हा दिवस सहसा भर उन्हाळ्यात येत असल्याने आपण गार पाणी पितो मात्र पूर्वी अक्षय्य तृतीयेपासून गार पाणी पिण्याची परंपरा होती. मात्र हे करण्यापूर्वी पितरांना तीलतर्पण करून मातीच्या कोऱ्या भांड्यातील गार पाणी दान केले जात असे आणि मगच गार पाणी पिण्यास सुरुवात केली जात असे. अक्षय्य तृतीयेपूर्वी गार पाण्याचे सेवन केल्यास प्रकृतीस अपाय होतो असा प्रवाद असल्याने अक्षय्य तृतीयेपासूनच गार पाणी सेवन करावे अशी परंपरा पूर्वजांनी घालून दिली होती.
याच दिवसापासून खरं तर पाण्याचे दान करणे सुद्धा पुण्यकर्म समजले जाते. पूर्वी सार्वजनिक पाणपोया याच दिवसात सुरु केल्या जात आणि मनुष्य व इतर प्राणिजनांची तहान अतिशय कडाक्याच्या उन्हाळ्यात भागवणे एक सेवाच मानली जायची आणि उन्हाने करपून जाणाऱ्या झाडांना देखील या दिवसापासून पाणी घालून त्यांचे पावसाळा येईपर्यंत रक्षण केले जायचे.
यावरून एक लक्षात घेता येईल की अक्षय्य तृतीया हा दिवस शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस आहेच मात्र दानधर्म, भुकेल्या तहानलेल्या जीवांना व वनस्पतींना अन्न व पाण्याचे दान करण्यासाठी सुद्धा उत्तमच आहे. तेव्हा या अक्षय्य तृतीयेस या पुण्यकर्माची सुरुवात नक्कीच करा.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |