महाराष्ट्रातील संस्थाने

भारताच्या वेगवेगळ्या भागांवर अमल करणाऱ्या घराण्यांची पुढे संस्थाने निर्माण झाली. अशी संस्थाने शेकडो होती मात्र ब्रिटिशांनी आपले हात भारतभूमीत पसरायला सुरुवात केली आणि त्यांनी वेगवेगळी करणे देऊन संस्थाने खालसा करण्यास सुरुवात केली.

महाराष्ट्रातील संस्थाने
महाराष्ट्रातील संस्थाने

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा पुढे प्रचंड विस्तार झाला. समस्त भारतात मराठ्यांनी आपले अस्तित्व निर्माण केले. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात स्वराज्याच्या नकाशात भारताचा बहुतांश भाग सामील होता.

भारताच्या वेगवेगळ्या भागांवर अमल करणाऱ्या घराण्यांची पुढे संस्थाने निर्माण झाली. अशी संस्थाने बरीच होती मात्र ब्रिटिशांनी आपले हात भारतभूमीत पसरायला सुरुवात केली आणि त्यांनी वेगवेगळी करणे देऊन संस्थाने खालसा करण्यास सुरुवात केली.

१८५७ च्या उठावानंतर देशाचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटनच्या राणीकडे गेल्यावर संस्थाने खालसा करण्यास चाप बसला. यानंतर अनेक संस्थाने अगदी भारत स्वतंत्र होईपर्यंत अस्तित्वात होती. १९४७ सालानंतर या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यात आले.

अशाच काही ब्रिटिशकाळात अस्तित्वात असलेल्या संस्थानांची माहिती या सदरातून करून घेण्याचा प्रयत्न करू. ही यादी पूर्ण नाही त्यामुळे या यादीत भर घालण्याचा प्रयत्न कायम राहील मात्र जी यादी तूर्तास हाती आली आहे त्या संस्थानांबद्दल थोडक्यात जाऊन घेऊ.

औंध संस्थान 

सध्या सातारा जिल्ह्यांतर्गत असणारे भोर हे एकेकाळी स्वतंत्र संस्थान असून या संस्थानावर पंतप्रतिनिधी घराण्याचे शासन होते. ब्रिटिश काळात औंध संस्थानाचा डेक्कन स्टेट्स एजन्सीज मध्ये समावेश होत असे. संस्थानाचे क्षेत्रफळ ५०१ चौरस मैल एवढे होते. या संस्थानात औंध, आटपाडी, कुडल व गुणदाल असे चार तालुके व किन्हई नावाचे ठाणे असे प्रशासकीय विभाग तयार करण्यात आले होते. या पाच विभागांत एकूण ७२ गावांचा समावेश होत असे. 

संस्थानाचे अधिपती पंतप्रतिनिधी हे घराणे असून या घराण्याच्या पुरुषांनी सातारा येथील छत्रपतींची पंतप्रतिनिधी या पदाखाली काम केले होते. औंध संस्थानात एकूण तीन मोठी शहरे असून त्यांची नवे अनुक्रमे औंध, कुडल व आटपाटी अशी होती. या गावांना नगरपालिका होत्या.  संस्थानातील किर्लोस्करवाडी येथे मोठे उद्योग असून तेथून लोखंडापासून निर्मिती करण्यात आलेली अनेक उत्पादने तयार केली जात असत. याशिवाय संस्थानातील कंदील, काचेच्या वस्तू, साबण, पम्प अतिशय विख्यात होते. संस्थानात पूर्वी श्रीयमाई श्रीनिवास हायस्कुल ही मोठी शाळा असून संस्थानातील अनेक विद्यार्थी तेथे शिकण्यास जात असत. संस्थानाचे अधिपती भवानराव यांना व्यायामाची आवड असल्याने सादर शाळेत शारीरिक शिक्षण, कवायतींवर भर दिला जात असे. 

इचलकरंजी संस्थान

इचलकरंजी हे संस्थान पूर्वी कोल्हापूर संस्थानाच्या अखत्यारीत होते व येथील कारभार पटवर्धन नावाचे घराणे पाहत असे. सध्या संस्थानाचा समावेश कोल्हापूर जिल्ह्यात होतो. कापसाच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून संस्थान प्रसिद्ध होते याशिवाय भुईमूग, तंबाखू, मिरच्या, तांदूळ इत्यादी पिकेही येथे घेतली जात. 

कोल्हापूर 

कोल्हापूर संस्थानाचे संस्थापक म्हणजे छत्रपती राजाराम यांचे पुत्र संभाजी महाराज. ब्रिटिशकाळात या संस्थानाचे क्षेत्रफळ सुमारे ३२१७१ चौ मैल होते व यापैकी १०९२५ चौ मैल क्षेत्र हे सरंजामी जहागिरीचे होते. संस्थानाची राजधानी कोल्हापूर शहर असून सध्या कोल्हापूर हे शहर कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. 

कोल्हापूर संस्थान हे साखरेचे कोठार म्हणून प्रख्यात होते व आजही आहे व त्याकाळी कोल्हापूर शुगर मिल्स ही कंपनी संस्थानातील एक मोठी कंपनी होती. याशिवाय सरकी काढण्याचे, गट्ठे बांधण्याचे कारखानेही, विद्युत निर्मिती, चित्रपट निर्मिती, लाकडापासून बाष्पाचा अर्क काढणे असे उद्द्योगधंदे येथे होते. 

दळणवळणासाठी कोल्हापूर स्टेट रेल्वेची निर्मिती करण्यात आली होती. कोल्हापूर संस्थानाने शिक्षणाकडे विशेष लक्ष दिल्याने संस्थानात अनेक शाळा व कॉलेजेस स्थापन करण्यात आली होती. 

जत संस्थान

जत संस्थान हे सध्याच्या  सांगली जिल्ह्यात येत असून डोंगराळ भागातील संस्थान अशी संस्थानाची ख्याती होती. संस्थानाचे क्षेत्रफळ ९८०८ चौरस मैल एवढे होते. या संस्थानाचे अधिपती ढाफळे नावाचे घराणे होते. पूर्वी या संस्थानामध्ये कापड विणणे, बांगड्या व पितळेची भांडी मुबलक प्रमाणात तयार केली जात होती. पूर्वी संस्थानाचे मुख्य उत्पन्न शेती हे असले तरी पाऊस पडला तरच शेतीस वाव मिळत असे.

जमखिंडी संस्थान 

पूर्वीच्या बेळगाव व विजापूर तालुक्यात असलेले संस्थान म्हणजे जमखिंडी संस्थान. या संस्थांनातही जमखिंडी व कुंदगोळ असे दोन तालुके होते. या संस्थानाचे क्षेत्रफळ ५२४ चौरस मैल इतके होते. जमखिंडी, कुंदगोळ व बनहट्टी अशी तीन मोठी शहरे संस्थानात होती. संस्थानात हातमागाचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असत. 

फलटण 

फलटण संस्थानाचे मूळ संस्थापक म्हणजे निंबराज. यांच्या नावावरून घराण्यास निंबाळकर असे उपनाव प्राप्त झाले. निंबराजाने निंबळक या गावाची स्थापना केली त्यावरूनही घराण्यास निंबाळकर असे म्हटले जाते. या संस्थानाचे क्षेत्रफळ ३९७ चौरस मैल होते. ज्वारी, बाजरी, गहू आणि करडी अशी पिके या संस्थानात प्रामुख्याने घेतली जात. सध्या हे संस्थान सातारा जिल्ह्याचा भाग असून तालुक्याचे ठिकाण आहे. 

बडोदे संस्थान 

बडोदा संस्थानाचे क्षेत्रफळ सुमारे ८१६४ चौरस मैल असून या संस्थानाचे अधिपती गायकवाड हे होते. संस्थानात पूर्वी नवसारी आणि मेहसाना असे दोन सुभे होते व त्यांच्यांतर्गत बडोदा, अमरेळी आणि ओखामंडळ अशी मोठी शहरे येत असत. सध्या या संस्थानाचा समावेश गुजरात राज्यात होतो.

भोर संस्थान 

भोर संस्थानाचे अधिपती पंतसचिव असून त्याचे क्षेत्रफळ ९१० चौरस मैल होते. या संस्थांच्या हद्दीत सध्याच्या पुणे, सातारा व रायगड जिल्ह्यातील काही भाग होते व संस्थानात एकूण पाच तालुके असून तीन तालुके पुणे जिल्ह्यातील, एक साताऱ्यातील व एक रायगड जिल्ह्यातील असे होते. सह्याद्रीस लागून असल्याने संस्थानाचा भाग डोंगराळ होता व पूर्वापार कोकण व घाटमाथ्यावरील संस्कृतीचे मिश्रण या संस्थानात अगदी आजही पाहावयास मिळते. सध्या संस्थानाचा समावेश पुणे जिल्ह्यात होत असून संस्थानाच्या राजधानीचे शहर भोर हे तालुक्याचे ठिकाण आहे.