स्वामिनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस

स्वामिनिष्ठतेचे एक उदाहरण म्हणजे खंडो बल्लाळ चिटणीस. खंडो बल्लाळ हे शिवरायांचे सचिव बाळाजी आवजी चिटणीस यांचे द्वितीय पुत्र. त्यांचा जन्म १६६८ सालचा.

Apr 23, 2024 - 01:02
 65
स्वामिनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस
स्वामिनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस

आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.

आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.

काही चरित्रे स्वामिनिष्ठतेचे उत्तम उदाहरण असतात. स्वामिनिष्ठता म्हणजे कठीण प्रसंगातही स्वामीची साथ सोडून न जाणे व स्वामीकार्यात आपल्या प्राणांचीही बाजी लावणे.

स्वामिनिष्ठतेचे असेच एक उदाहरण म्हणजे खंडो बल्लाळ चिटणीस. खंडो बल्लाळ हे शिवरायांचे सचिव बाळाजी आवजी चिटणीस यांचे द्वितीय पुत्र. त्यांचा जन्म १६६८ सालचा. चिटणीस घराण्याचे मूळ आडनाव चित्रे व ते कोकणातील मुरुड जंजिरा येथील राहणारे होते. हा परिसर फार पूर्वी पासून हबसाण या नावाने ओळखला जात असे. हबसाण म्हणजे हबशी लोकांचे राज्य. हबशी म्हणजेच सिद्दी. 

स्वराज्याच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी बाळाजी आवजी यांचे घराणे सिद्दीकडे चाकरीस होते. एके दिवशी बाळाजी आवजी यांचे काका ज्यांचे नाव खंडोबा असे होते सिद्दीच्या रोषास बळी पडले. या घटनेनंतर बाळाजी आवजी स्वराज्याच्या सेवेत दाखल झाले. आपल्या थोरल्या मुलाचा जन्म झाल्यावर त्यांनी त्याचे नाव आपल्या काकांच्या नावावरून खंडो असे ठेवले. 

संभाजी महाराजांविरोधात विरोधी गटाने उपद्रव केला त्यावेळी बाळाजी आवजी आणि त्यांचे पुत्र आवजी हे दोघे कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून मारले गेले. मात्र खंडो बल्लाळ व सोनो बल्लाळ या बाळाजी आवजी यांच्या पुत्रांचे प्राण महाराणी येसूबाई यांनी मध्यस्थी केल्याने वाचले. येसूबाई यांनी संभाजी महाराजांना समजावल्यावर त्यांनी चिटणीसांच्या घरावर बसवलेली जप्ती उठवून चिटणिसीचा कारभार खंडो बल्लाळ यांच्याकडे सोपवला. खंडो बल्लाळ यांना चिटणिशी मिळाली त्यावेळी त्यांचे वय फक्त १३ ते १४ वर्षे असावे.

गोव्याच्या स्वारीत खंडो बल्लाळ यांचा पराक्रम संभाजी महाराजांना दिसून आला. या मोहिमेदरम्यान संभाजी महाराजांनी जुवे या बेटावर हल्ला करून पोर्तुगिजांकडील किल्ला ताब्यात घेतला मात्र आपली हार होत आहे हे पाहून पोर्तुगीजांनी तेथील बांध उध्वस्त केले व पळून जाऊ लागले. संभाजी महाराजांनी भर पाण्यात आपला घोडा दामटवला मात्र खाडीत भरती सुरु झाली आणि महाराजांचा घोडा खोल पाण्यात जाऊ लागला. खंडो बल्लाळ यांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उडी मारली व घोड्यास पकडून ठेवले त्यामुळे संभाजी महाराज सुखरूप खाडीच्या पाण्यातून बाहेर पडले. लेखणीबरोबरच खंडो बल्लाळ तलवारबाजीतही कामाचा आहे हे संभाजी महाराजांना या मोहिमेदरम्यान कळून चुकले. 

एकदा संभाजी महाराजांची स्वारी संगमेश्वर येथे होती व महाराणी येसूबाई संभाजी महाराजांची भेट घेण्यास तेथे निघाल्या होत्या इतक्यात मोगलांनी छापा मारला. यावेळी खंडो बल्लाळ यांनी जलदगतीने आपली मावसबहीण संतुबाई यांना येसूबाईंच्या पालखीत बसवले. मोगलांचा छापा पडला आणि संतुबाईंना येसूबाई समजून अटक करण्यात आले. संतुबाईंनी हिरा खाऊन स्वराज्यासाठी आपले प्राण दिले.

राजाराम महाराज जेव्हा रायगडावरून जिंजी येथे जाण्यास निघाले तेव्हा सोबत असलेल्या विश्वासू माणसांमध्ये खंडो बल्लाळ सुद्धा होते. सर्वानी वेषांतर केले होते मात्र एक दिवस राजाराम महाराज यांच्या चरणावर धनाजी पाणी ओतताना पाहून मुघलांना संशय आला. यावेळी सुद्धा खंडो बल्लाळ यांनी स्वतः व निळो येसाजी असे दोघेच मागे राहून उरलेल्याना पुढे जाण्यास सांगितले. 

मागे राहिल्याने दोघेही मुघलांच्या हाती लागले. पाच दिवस अन्न पाण्याशिवाय अंधारकोठडी व मार दिला तरी खंडो बल्लाळ यांनी तोंड उघडलें नाही तेव्हा मुघलांचा विश्वास बसून त्यांनी खंडो बल्लाळ यांची मुक्तता केली. 

यानंतर खंडो बल्लाळ राजाराम महाराज यांना जाऊन मिळाले. या ठिकाणी त्यांची पत्नी म्हाळसाबाई यांचा मृत्यू झाला. राजाराम महाराज जिंजीस गेल्यावर झुल्फिकार खान याने जिंजीस वेढा घातला, तब्बल सात वर्षे हा वेढा सुरु होता. या दरम्यान साताऱ्यास काही कामानिमित्त राजाराम महाराज यांनी खंडो बल्लाळ यांना रवाना केले मात्र सातारा येथे जाताना तारबियातखान याने खंडो बल्लाळ यांना कैद केले. 

कैदेत असताना खंडो बल्लाळ यांनी तेथील पहारेकऱ्याशी संधान बांधले आणि स्वतःच्या जागी पुत्र बहिरोबा यास ठेवून ते अटकेतून सटकले. कैदेतून बाहेर पडताना त्यांना उंच ताटावरून उडी घ्यावी लागली. या उडीमुळे त्यांचा एक पाय कायमचा निकामी झाला. त्यांचे पुत्र बहिराव यांचे धर्मांतर करण्यात आले मात्र ते सहन न होऊन त्यांनी आत्महत्या केली.

येथे जिंजीच्या वेढ्यास सात वर्षे झाली मात्र वेढा तसाच होता. जास्त दिवस वेढ्यात राहणे धोक्याचे आहे हे पाहून राजाराम महाराजांनी तेथून निघून जाणे योग्य समजले. वेढ्यात जागोजागी चौक्या होत्या मात्र ज्या ठिकाणी शिर्के यांची चौकी होती तिथून निसटून जाणे योग्य राहील हे जाणून राजाराम महाराजांनी शिर्के यांच्यासोबत संधान बांधण्यासाठी खंडो बल्लाळ यांना तेथे रवाना केले. चौकी मोकळी करण्यासाठी खंडो बल्लाळ यांना आपले दाभोळचे खासगी वतन शिर्के यांना द्यावे लागले आणि यानंतर राजाराम महाराजांना चौकीतून निसटून जाऊ दिले गेले. 

याच वेढ्यात खंडो बल्लाळ यांची पत्नी आणि मुलगी दोघे अडकून पडले होते मात्र असे म्हणतात की झुल्फिकार खान याच्या बायकोस त्या छोट्या मुलीचा लळा लागला व जर मुलीस येथे ठेवत असाल तर बायकोस सोडते असे त्यांना सांगितल्यावरून खंडो बल्लाळ यांना मुलीचा त्याग करून पत्नीची सुटका करून घ्यावी लागली. 

शाहू महाराज व येसूबाई यांची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली तेव्हा सर्व मराठा सरदारांचे मत शाहू महाराजांकडे वळवण्यात खंडो बल्लाळ यांचाही महत्वाचा सहभाग होता. खेमसावंत यांच्याविरोधात लढताना शाहू महाराज एका उतरणीवर घोड्यावरून घसरले त्यावेळी सुद्धा त्यांनी घोड्याचा तोल राखला व शाहू महाराजांना संकटातून वाचवले. 

असे हे स्वामिनिष्ठ खंडोबल्लाळ, यांच्या घराण्यातील अनेक जण स्वामीकार्यास कामी आले व त्यांनी स्वतः अनेक कठीण प्रसंगात स्वामी निष्ठता दाखवून स्वराज्याची अमूल्य सेवा केली. १७२६ साली खंडो बल्लाळ यांचे निधन झाले.

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा