दुर्गपरिभाषा - भाग ४

दुर्गावर एका मुख्य दरवाजाशिवाय अडचणीच्या प्रसंगी दुर्गावरून निसटून जाण्यासाठी ठेवलेला छोटासा दरवाजा. हा दरवाजा अडचणीच्या जागी सहसा कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा रीतीने लपवलेला असे व काही महत्वाच्या व्यक्ती व हेरांशिवाय फारसा कोणाला माहित नसे. - संतोष विष्णू जाधव (पुणे)

दुर्गपरिभाषा - भाग ४

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

चर्या/प्राकारफलिका - तटबंदीच्या माथ्यावर आडोशासाठी बांधलेल्या विशिष्ट आकारातील बांधकामाला चर्या  म्हणतात. दुर्गांवर आपणास चर्येचे विविध आकार पाहावयास मिळतात. मात्र बहुतेक वेळा या चर्या कमळ पाकळी सारख्या बांधलेल्या दिसून येतात. दुर्गाच्या तटाशी शत्रू भिडला म्हणजे या चर्या तटावरील सैन्यास लपून मारा करण्यास कामी येतात.

चोरदिंडी - दुर्गावर एका मुख्य दरवाजाशिवाय अडचणीच्या प्रसंगी दुर्गावरून निसटून जाण्यासाठी ठेवलेला छोटासा दरवाजा. हा दरवाजा अडचणीच्या जागी सहसा कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा रीतीने लपवलेला असे व काही महत्वाच्या व्यक्ती व हेरांशिवाय फारसा कोणाला माहित नसे. गरज नसताना हा मार्ग चिणून ठेवत असत जेणेकरून शत्रूस त्याचा वापर करता येऊ नये. गुंजवणे गावातून सध्या येणारी वाट हि पद्मावती माचीवर अशाच एका चोर दिंडीतून येते. सुवेळा माचीवरील गणपती मुर्तीच्या जवळ देखील अशीच चोरदिंडी आहे. या चोरदिंड्या किती महत्वाच्या आहेत हे सांगताना आज्ञापत्रकार म्हणतात - किल्यास एक दरवाजा थोर आयब आहे. याकरिता गड पाहून एक-दोन-तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्यात. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्यात.

जिभी/हस्तिनख - दरवाजाच्या बहरून दुर्गाच्या आत काय चालले आहे हे समजू नये यासाठी किल्याच्या प्रवेशद्वारापुढे बांधलेली संरक्षणात्मक भिंत म्हणजेच जिभी. कधी हा आडोसा दोन्ही बाजूस उघड असतो तर कधी एका बाजूने बंदिस्त असतो. अशी जिभी विजयदुर्ग, राजमाचीवरील मनरंजन, गोवळकोंडा, दिल्ली अशा अनेक किल्यांवर दिसते. शिवनेरीवर देखील एका द्वारापुढे अशी जिभी बांधलेली दिसते.

जंग्या/प्रकाररंध्र  - तटबंदी व चर्यामध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा मारा करण्यासाठी ठेवलेल्या व दुर्गाच्या बाहेरच्या बाजूस उतरत गेलेल्या छिद्रांना जंग्या म्हणतात. या जंग्या तटबंदीप्रमाणे बुरुजात देखील ठेवलेल्या असतात.

जकीरा  - गडावरील सर्व राखीव  सामग्रीस जकीरा म्हणतात. जकिरियाचे पाणी अतिशय काळजीपूर्वक जतन करून ठेवावे असे आज्ञापत्र सांगते.

जंजिरा/द्वीप - बेटावरील दुर्ग अथवा जलदुर्ग.

टाके/अष्मकूप: - कातळात कोरलेलले अथवा खोदून किंवा काढलेले पाण्याचे तळे.

तारत्खाना/मलस्थानम - दुर्गावरील शौचकूप. हे शौचकूप मुख्यत्वे तटबंदीत बांधण्यात येत. यामुळे गस्तीवरील सैनिकांस प्रातर्विधी साठी दूरवर जाण्याची आवश्यकता नसे. आजही लोहगड, राजगड, रायगड, तळागड, सिंधुदुर्ग अशा अनेक दुर्गांवर हे शौचकूप दिसून येतात. तळागडावरील तटबंदीत ४० शौचकूप पाहण्यात आले होते.

दिवाणवाडा/राजमंदिरम् - दुर्गावरील राजाचे घर. सर्वच दुर्गावर राजमंदिर असले तरी राजाची उपस्थिती हे क्वचितच असे. मात्र असे असले तरी हे राजमंदिर खाली ठेवले जात नसे. इतर प्रसंगी त्यात किल्लेदार निवास करीत असे. राजा गडावर येणार याची वर्दी मिळाल्यावर किल्लेदाराने राजमंदिर सारवून, रांगोळी घालून, धुरी देऊन (आजच्या भाषेत निर्जंतुक करून) नीट करून सदर घालून बसावे असे आज्ञापत्रकार सांगतात.

देवडी/देहली - प्रवेशद्वारा जवळ पहारेकऱ्याना विश्रामासाठी केलेली सोय अथवा चौथरा म्हणजे देवडी.

दारूखाना - तोफा बंदुकांसाठी लागणारी दारू, तोफगोळे, होके अशी युद्धपयोगी सामग्री साठविण्याचा ठिकाण म्हणजे दारूखाना अथवा दारुकोठार होय. दारुकोठार हे दुर्गावरील मनुष्यवस्तीपासून दूर, दुर्गाच्या एका टोकाला व सहजपणे मारा करता येणार नाही अशा जागी बांधीत. याशिवाय युद्धजन्य परिस्थितीत आवश्यकतेनुसार दारुगोळा आणून तटबंदी किंवा बुरुजालगत आणून छोट्या खोल्यांमध्ये ठेवला जाई त्याला सुद्धा दारुकोठार म्हणत. विसापूरवर असं बुरुजालगत असणारे छोटं दारुकोठार आढळते. प्रसंगी तटबंदी अथवा बुरुजात साठवून ठेवलेला दारूगोळा पेट घेऊन मोठी हानी होई. पुरंदरच्या लढाईत माचीवरील तटबंदीतील दारूकोठाराचा स्फोट होऊन त्यात मराठयांची बरीच हानी झाली होती.

नगारखाना - दुर्गाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती नगारा/चौघडा वाजविण्यासाठी असणारी जागा. अनेक महत्वाच्या मंदिरांमध्ये सुद्धा नगारखाने पाहावयास मिळतात. रायगडचा नगारखाना सुप्रसिद्ध आहे.  

पडकोट/प्राकारवलायम् - कोट म्हणजे दुर्गाचा तट. एका आड एक असणारा तट म्हणजे पडकोट. अर्थात ही त्याची ढोबळ व्याख्या झाली. आज आपणास जे पडकोट पहावयास मिळतात ते थोडे वेगळे आहेत. मुख्य दुर्गापासून तटबंदीने वेगळा झालेला/केलेला भाग ज्यात मुख्य दुर्गाप्रमाणेच काही बांधकामे दिसून येतात. चाकण, पदमदुर्ग अशा काही ठिकाणी हे पडकोट असे वेगळेपणाने दिसून येतात. चाकणचा पडकोट तर मुख्य दुर्ग वा बालेकिल्यापासून खंदकाने वेगळा केलेला आहे. पडकोट व मुख्य दुर्ग यांना जोडन्यासाठी खंदकावर गरजेनुसार काढता व घालता येणारा पूल देखील येथे होता.

फांजी/प्रकारवेदिका - तटाच्या माथ्यावर फिरता यावे, गस्त घालता यावे यासाठी निर्माण केलेली सपाटी अथवा पृष्ठभाग. वेल्लोर, भुदरगड अशा काही किल्यांची फांजी खूप प्रशांत आहे. या फांजीवरून अगदी बैलगाडी सुद्धा जाऊ शकते. क्रमशः

- संतोष विष्णू जाधव (पुणे)