शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले दुर्ग

जुन्या साधनांनुसार महाराजांनी एकूण १११ नवे किल्ले निर्माण केल्याचा उल्लेख येतो. हे किल्ले कोणते हे आपण या लेखातून जाणून घेऊ.

शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले दुर्ग

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

महाराष्ट्रात अदमासे ३५० गडकोट आहेत. खरं तर भारतात किल्ले उभारण्याची पद्धत फार पूर्वीपासून चालत आली आहे. प्राचीन काळी भुईकोट या प्रकाराला खूप महत्व होते. नगराच्या चोहो बाजूस तटबंदी उभारणे नगराच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्वाचे असायचे.

पुढे व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने डोंगरी किल्ल्यांना महत्व प्राप्त झाले. समुद्री सत्ता व समुद्रावर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती होऊ लागली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मच शिवनेरी या दुर्गावर झाला असल्याने जन्मापासूनच त्यांना गडावरील वातावरणात राहण्याची सवय झाली होती. पुणे प्रांतातही कोंढाणा, पुरंदर इत्यादी मजबूत किल्ले पूर्वीपासून अस्तित्वात होते.

शत्रूशी लढा द्यावयाचा तर जुने गडकोट ताब्यात आणून नव्या गडकोटांची निर्मिती करणे शिवरायांना गरजेचे वाटले त्यादृष्टीने त्यांनी प्रांतातील डोंगरी किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली व नंतर नव्या किल्यांची निर्मिती सुरु केली. राज्य वाढत जाऊ लागले तसतसे डोंगरी किल्यांशिवाय जलदुर्ग बांधणे गरजेचे होऊ लागले.

जुन्या साधनांनुसार महाराजांनी एकूण १११ नवे किल्ले निर्माण केल्याचा उल्लेख येतो. हे किल्ले कोणते हे आपण या लेखातून जाणून घेऊ. ही यादी बखरीमध्ये सापडते. यामध्ये शिवरायांनी नव्याने बांधलेल्या किल्यांचीच नावे आहेत. महाराजांनी महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिणेतही किल्ल्यांची निर्मिती केली ते किल्ले सध्या यादीत नाही आहेत. फक्त महाराष्ट्र प्रांतीच्या किल्यांची नावे दिली आहेत. पूर्वी जे किल्ले होते त्यांची नावे नाहीत. मूळ नावाव्यतिरिक्त या दुर्गाना काही स्थानिक नावे आहेत तर काहींचे अपभ्रंश झाले आहेत. काही किल्यांची नावे इतकी दुर्लभ आहेत की सध्या त्यांचे स्थान कुठे हे समजणे कठीणच. मात्र जसजशी अधिक माहिती मिळत जाईल तसतशी ती येथे अद्यायावत करण्याचा प्रयत्न करू.

अनुक्रम किल्ल्याचे नाव
1 राजगड
2 तोरणा
3 केंजळगड
4 वैराटगड
5 कमळगड
6 वर्धनगड
7 प्रतापगड
8 मंगळगड
9 गहनगड
10 पद्मगड
11 सुबकरगड
12 सबळगड
13 बहिरवगड
14 गगनगड
15 सारंगगड
16 सुरगड
17 विजयदुर्ग
18 सिंधुदुर्ग
19 खांदेरी
20 पावनगड
21 पारगड
22 भिवगड
23 भूधरगड
24 सहजगड
25 लोणजागड
26 कांचनगड
27 सिदगड
28 वसंतगड
29 सुंदरगड
30 नाकगडगड
31 महिमानगड
32 व्यंकटगड
33 माणिकगड
34 लोकलगड
35 कोथळागड
36 श्रीवर्धनगड
37 कमरगड
38 वासोटा
39 खोलगड
40 प्रचितगड
41 प्रौढगड
42 वनगड
43 नरगुंदगड
44 रामदुर्ग
45 बालेराजा
46 अंजनवेल
47 सुरगड
48 मिरगड
49 श्रीमंतगड
50 गजेंद्रगड
51 कोट येळूर
52 कनकाद्रीगड
53 रावळागड
54 नाचणा गड
55 रामसेज
56 रुद्रमाळ
57 सामानगड
58 वल्लभगड
59 महिपालगड
60 नवलगुंद
61 पटगड
62 सोनगड
63 कुंजरगड
64 तुंगगड
65 महिपतगड
66 मदनगड
67 कांगोरी
68 वारुगड
69 भूषणगड
70 कोट बोटगीर
71 कंबलगड
72 स्वरुपगड
73 ढोलागड
74 मनरंजन गड
75 बहुलगड
76 महिंद्रगड
77 रजेगड
78 बळवंतगड
79 श्रीगलडवगड
80 पवित्रगड
81 कलानिधीगड
82 गंधर्वगड
83 सुमनगड
84 गंभीरगड
85 मंदारगड
86 मर्दनगड
87 दहिगड
88 मोहनगड
89 गडागड
90 वीरगड
91 तिकोना
92 सुवर्णदुर्ग
93 जंजिरे रत्नागिरी
94 राजकोट
95 सेवणागड
96 सेवकगड
97 कोहजगड
98 कठोरगड
99 भास्करगड
100 कपालगड
101 हरिश्चन्द्रगड
102 कुलाबा
103 सिद्धगड
104 मंडणगड