गणेशगुळे येथील प्राचीन पायऱ्यांची विहीर
गणेशगुळे येथील गणपती मंदिर हे पूर्वीपासून एक प्रख्यात देवस्थान असल्याने मंदिराचे पुजारी, सेवेकरी तसेच भाविकांच्या पाण्याची गरज भागविण्याकरिता ही विहीर बांधली गेली असावी हे स्पष्ट आहे कारण मंदिर हे गावापासून थोडे दूर असल्याने मंदिराच्या परिसरातच पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक होते.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशगुळे हे गाव आपल्या निसर्गसौंदर्यासोबत येथे असलेल्या स्वयंभू व पुरातन अशा गणेश मंदिराकरिता प्रसिद्ध आहे मात्र या स्थळी आणखी एक मानवनिर्मित आश्चर्य पाहावयास मिळते व ते म्हणजे मंदिरासमोर असलेली प्राचीन पांडवकालीन विहीर.
समुद्रसपाटीपासून ६५ उंच मीटर टेकडीवर आणि संपूर्णपणे जांभा खडकात कोरलेली ही विहीर तिच्या वैशिट्यपूर्ण आकारामुळे पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनली आहे. ही विहीर अदमासे ७० फूट खोल असून तिची पूर्ण लांबी ४७ मीटर व रुंदी ८ मीटर आहे.
या विहिरीचे बांधकाम नेमके कुठल्या काळात झाले हे आजही गूढच असले तरी स्थानिक मतानुसार ही विहीर पांडवकालीन असल्याची मान्यता आहे.
गणेशगुळे येथील गणपती मंदिर हे पूर्वीपासून एक प्रख्यात देवस्थान असल्याने मंदिराचे पुजारी, सेवेकरी तसेच भाविकांच्या पाण्याची गरज भागविण्याकरिता ही विहीर बांधली गेली असावी हे स्पष्ट आहे कारण मंदिर हे गावापासून थोडे दूर असल्याने मंदिराच्या परिसरातच पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक होते.
विहिर दोन भागात विभागली असून एक भाग लांब, अरुंद व आयताकृती आहे व दुसरा भाग चौकोनी आहे. विहिरीच्या तळाशी जाण्यास आयताकृती भागातून पायऱ्या कोरण्यात आल्या आहेत. निमुळत्या होत जाणाऱ्या अंतर्भागातील पायऱ्या उतरत आपण विहिरीच्या तळाशी आल्यावर एक दरवाजा दिसून येतो जो विहिरीच्या दुसऱ्या भागात जातो. या दाराद्वारे विहिरीच्या दोन्ही भागांमधील पाणी एक होण्याची व्यवस्था केली आहे.
कोकणात जशी निसर्गनिर्मित आश्चर्ये विपुल प्रमाणात आहेत तशीच मानवनिर्मितही आहेत व या मानवनिर्मित आश्चर्यांपैकी एक म्हणजे ही प्राचीन विहीर. या विहिरीचे दर्शन घेतल्यानंतर तिच्या निर्मात्याच्या कलेची स्तुती केल्याशिवाय राहवत नाही.