एव्हर गिव्हन - सुएझ कालव्यात अडकलेलं महाकाय जहाज
गेले काही दिवस आपण Ever Given नावाचे एक जहाज सुएझ कालव्यात अडकले असल्याची बातमी ऐकत असाल. या घटनेचे थोडे विस्ताराने विश्लेषण करून पाहू.
आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.
आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.
तत्पूर्वी आपल्याला या जहाजाची थोडी माहिती देतो. M.V Ever Given हे जहाज कंटेनर प्रकाराचे असून जगातल्या सर्वांत मोठ्या कंटेनर जहाजांपैकी एक आहे व अधिकतम २०,०००वर कंटेनर वाहून नेतं. हे जहाज Shoei Kisen Kaisha नावाच्या जपानी कंपनीच्या मालकीचे आहे. त्याचे, जर्मनीची Bernhard Schulte Ship Management नावाची कंपनी तांत्रिक व्यवस्थापन करते.
हे जहाज जवळपास ४०० मीटर लांबीचे असून ६० मीटर रूंद आहे. आणि त्याचे एकूण वजन २,००,००० टनांइतके आहे. जहाजाला चालना द्यायला ७९,५०० अश्वशक्तिचे प्रमुख इंजीन आहे व त्याव्यतिरिक्त त्यावर वीज निर्माण करायची ४ छोटी (?!) इंजीन्स आहेत. जहाजाचा ताशी वेग जास्तीत जास्त २२.८ नॉट्स म्हणजेच साधारण ४२.२ किलोमीटर प्रति तासाएवढा आहे. जहाजाला बाजूंनी थोपावण्याकरिता दोन थ्रस्टर्सही योजिलेले आहेत.
असे हे महाकाय जहाज चीनच्या 'तानजूंग पेलेपास' नावाच्या पोर्ट वरून 'रॉटरडॅम' ला जाण्याकरिता निघाले होते. कन्टेनर प्रकारातल्या जहाजांचा वेग इतर जहाजांच्या तुलनेत जास्त असतो कारण त्यांना वेळ गाठायची घाई असते. अन्यथा त्यावरील नाशवंत माल खराब होण्याची शक्यता असते. आशियातून जहाजांना युरोपात जायला सुएझ कालव्यातून जावे लागते. 'सुएझ कालवा' हा लाल समुद्र ते भुमध्य समुद्राला जोडणारा मानवनिर्मित दुवा आहे.
दररोज या कालव्यातून साधारण ९.६ बिलियन डॉलर्सच्या मालाची वाहतूक होत असते. हा कालवा नाही, तर भुमध्य समुद्रात माल पोहोचवायचा तर आफ्रिकेला वळसा घालावा लागेल, ज्यामुळे मालाला पोहोचायला ८-१० दिवसांची भर पडेल. असा हा इजिप्तची जगाला भेट असलेला १९३ किमी लांबीचा कालवा साधारण १५० वर्षांपूर्वी निर्माण केलेला आहे. या जहाजाने १९३ पैकी जवळपास १५१ किमी चा भाग ओलांडला होता.
हा काळ सहारा वाळवंटातून मोठ्या प्रमाणात वाळूचे वादळं येण्याचा आहे. त्यामुळे जोरदार वारे सुएझ कालव्यात सुद्धा वाहात असतात. जहाजाने पुर्वेकडील मुखापाशी कालव्यातून जहाजाला मार्गदर्शन करणारा, सुरक्षित वाट काढून देणारा जो 'पायलट', त्याला बरोबर घेतले (जे बंधनकारक असते) आणि कालव्यात मार्गस्थ झाले. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे जहाज किनाऱ्यावर ओढले गेले. त्याला वाचवण्यासाठी जहाजाची दिशा बदलली गेली, पण त्यामुळे जहाज अधिक अस्थिर झाले व त्यानंतर एका मोठ्या वाऱ्याच्या झोतामुळे जहाज कालव्याच्या उत्तरेकडील तटाच्या रेतीत रुतले.
जहाज अडकले आणि व्यापारी जगताची हवा तंग झाली. जसे जहाज रुतले, तसे त्याला परत पाण्यात तरंगवण्याकरिता जहाजावरील कर्मचाऱ्यांचे प्रयत्न चालू झाले. ज्या ठिकाणी तासाभराच्या विलंबाकरिता मोठा दंड भरावा लागतो, तिथे प्रयत्न करूनही जहाज हलेनांत म्हणून ताबडतोब इजिप्तच्या सॅल्वेज टग्ज ('टग' हि एक ताकदवान इंजीन असलेली, जी ओढ-ढकल करण्याकरिता वापरली जाणारी एक बोट असते) आल्या व त्यांनी जहाजाला मोकळं करायची सुरूवात केली. दोन दिवस रात्रंदिवस प्रयत्न करून जहाज तसूभरही हलले नाही तेव्हा नामांकित डच सॅल्वेज कंपनी 'स्मिट सॅल्वेज बि.व्ही.' ला प्राचारण करण्यात आले व साधारण दहा टग्ज जहाजाच्या चहुबाजूंनी अतिशय कौशल्याने ओढत वा धक्का देऊ लागल्या. जहाजाच्या बलबसबोव्ह (जे पुढचं टोक) खालची वाळू किनाऱ्यावर टाकली जाऊ लागली. यात साधारणपणे ३०,००० घनमिटर वाळूचा उपसा केला गेला. जहाजावरील अतिरिक्त पाणीसाठा (जो पिण्याकरिता व वजन कायम ठेवण्याकरिता (बलास्ट) म्हणून वापरतात) बाहेर ओतला जाऊ लागला. जहाज हलकं केलं जाऊ लागलं. एव्हाना कालव्याच्या दोन्ही बाजूंना मिळून ३२० जहाजं अडकून पडली होती. कालची पौर्णिमा भरती घेऊन येणार होती. भरतीने पाण्याचा स्तर वाढणार होता. आणि तब्बल ५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर जहाजाला कालव्याच्या समांतर वळवण्यात यश मिळाले. पण अजूनही जहाज पूर्णपणे तरंगले नव्हते. सरतेशेवटी आज सकाळी जहाज पाण्यावर तरंगले आणि सर्व जगताने सुटकेचा निःश्वास टाकला.
जगातील साधारण ९०% व्यापार हा समुद्र मार्गे होत असतो. थांबलेला व्यापार त्यातून हल्लीचा जागतिक महामारीचा काळ. भारत दररोज अर्धा मिलियन बॅरल्स कच्च्या तेलाची आयात करतो व त्याच्या शुद्धीकरणातून मिळालेल्या तयार मालाची (साधारण २,००,००० बॅरल्स ची) निर्यात करतो. भारतात येणारं हे कच्चं तेल सर्वच सुएझ कालव्यातून येतं. याव्यतिरिक्त सिरीया देशात तेल न पोहोचल्याने तेलाचे भाव कडाडले. जागतिक तेलाच्या किमती ३% न्नी वाढल्या (व कालवा मोकळा झाल्याचे कळताच ३.५%न्नी कमी झाल्या). युरोपात ताज्या फळांचा व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. समुद्री व्यापार वरकरणी किनाऱ्यावर दिसत नाही, पण तो थांबल्यावर त्याचे थोडे काय होईना महत्व जगताला कळाले.
जहाजावरचे सर्व कर्मचारी भारतीय आहेत. जागतिक वाणिज्य सामुद्रिकी मध्ये भारताचे निर्विवाद वर्चस्व आहे. भारतीयांच्या नैपुण्याला जगाने प्रमाणित केले आहे. जहाजाला परत तरंगवण्याकरिता जहाजावरील कर्मचाऱ्यांचे प्रयत्न हे डच सॅल्वेज कंपनी इतकेच किंबहुना जास्तच आहेत. जागतिक व्यापार स्तब्ध झालेला असताना हरक्षणीं वाढणाऱ्या मानसिक व शारीरिक ताणावर मात देत दिवसरात्र अथक परिश्रम करून कालवा मोकळा करणाऱ्या सर्वच बहाद्दरांचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही.
- देवेंद्र गायधनी
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |