पतंग - एक सुंदर व आकाराने मोठा कीटक

पतंगास इंग्रजीमध्ये MOTH असे नाव असून कीटकांच्या प्रजातीतील आकाराने मोठा म्हणून त्याची ओळख आहे.

पतंग - एक सुंदर व आकाराने मोठा कीटक
पतंग

पृथ्वीवर असंख्य प्रकारातील प्राणी, पक्षी, मासे व कीटक आहेत व प्रत्येकाची वेगवेगळी वैशिट्ये आहेत व यापैकी कीटकांचे जे अनंत प्रकार आहेत त्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रजाती फुलपाखरू आणि पंतग या आहेत.

या लेखात आपण पतंग या प्रजातीबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मुळात फुलपाखरू आणि पतंग दिसावयास एकसारखे वाटत असले तरी त्यांच्यात बराच फरक आहे मात्र अनेकदा पतंगास फुलपाखरू असेच म्हटले जाते जे योग्य नाही. पतंगास इंग्रजीमध्ये MOTH असे नाव असून कीटकांच्या प्रजातीतील आकाराने मोठा म्हणून त्याची ओळख आहे.

पतंगाचे मुख्य वैशिट्य म्हणजे त्याला एका जन्मात स्वतःचेच दोन प्रकार पाहावयास मिळतात व यातील पहिला म्हणजे जमिनीवर सरपटत जाणारा सुरवंट आणि हवेत संचार करणारा पतंग हा एकच असतो हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल मात्र हे खरे आहे. जमिनीवरून सरपटणारा सुरवंट आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर संचार करणारा पंतग यात पाहावयास जमीन अस्मानाचा फरक आहे मात्र निसर्गाने त्याच्यावर अशी काही कृपा केली आहे जी फार कमी जीवांमध्ये केली असावी.

उडणारा पतंग जेव्हा अंडी घालतो आणि ती अंडी फलित होतात त्यावेळी त्यातून प्रथम सुरवंट बाहेर पडतो. सुरवंतास घुला असेही नाव आहे. सुरवंट हा काही काळ त्याच अवस्थेत राहतो मात्र काही काळ सरल्यावर तो आपली कातडी पूर्णपणे बदलतो आणि त्याच्या अवयवांची पूर्ण वाढ झाल्यावर तो झाडाच्या पानाच्या खालच्या बाजूस अथवा कुठल्यातरी कोपऱ्यात लपून राहतो आणि आपल्याभोवती कोशाचे आच्छादन करून घेतो.

हा कोश म्हणजे त्याच्या सुरक्षेचे भक्कम साधन असते जेणेकरून इतर प्राणी त्याला खाऊ शकत नाहीत आणि विशेष म्हणजे या कोशात तो शिरला की काहीही न खाता पिता तो अनेक दिवस शांत आणि स्थिर राहतो आणि काही काळ मृतप्राय आयुष्य जागून तो दुसरा जन्म घेण्यास सिद्ध होतो.

ज्यावेळी तो सुरवंट कोश फोडून बाहेर येतो त्यावेळी त्याचे पतंगात रूपांतर झालेले असते आणि हा सुंदर पतंग आपले विविध रंगानी बहरलेले पंख घेऊन झाडाझाडांवर संचार करून फुलांच्या रसाचा आस्वाद घेतो.

जगात अनेकजण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात मात्र पतंग हा असा एकमेव प्राणी आहे जो स्वतः खऱ्या अर्थी न मरता फक्त मृतप्राय होऊन त्याच शरीरातून नवा जन्म प्राप्त करतो हा खरोखरच निसर्गाचा एक चमत्कार आहे.