पोलादपूर- रायगडचे महाबळेश्वर

महाबळेश्वरला जायला वेळ नसेल आणि तुम्हाला पर्याय हवा असेल तर पोलादपूर निसर्गाचा नजराणा घेऊन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे.

पोलादपूर- रायगडचे महाबळेश्वर

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

पोलादपूर तालुक्यात अशी असंख्य ठिकाणे आहेत की आपण महाबळेश्वरला तर नाहीत ना असा भास पर्यटकांना झाल्याशिवाय राहत नाही. डोळ्यांचं पारण फिटावं अशी अनेक स्थळं पोलादपूर परिसरात आहेत.

त्यातं खोपडं ते चांदवे गावामागचा मोरझोत धबधबा, घागरकोंड येथील जलप्रपात आणि झुलता पूल, मिनी महाबळेश्वर म्हणून ब्रिटीशांनी ज्या भागाची नोंद केली ते कुडपण, रानवडी रस्त्यावरुन रानबाजिरे धरण परिसराचे सुंदर मनोहारी दृश्य, चोळई नदी लगतच्या मोरगिरी रस्त्यावरुन कशेडी घाटाचे घडणारे सुरेख दर्शन आदींचा समावेश होतो.

अन हो, मोरझोत धबधबा आणि घागरकोंड येथील झुलता पूल बघायला जाताना ऊन-पावसाचा आनंद लुटण्याबरोबरच लांडोरी आणि मोरांच्या दर्शनाची संधीही आपणास मिळते. मोरांची केकावली ऐकण्याचा स्वर्गीय आनंदही आपणास उपभोगता येतो.

रानकोंबडे, पाणबगळे प्रसंगी घारी आणि दुर्मिळ गिधाडंही आपली उपस्थिती नोंदवून पर्यटकांना आनंद देतात. निसर्गाखेरीज धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणं पहायची असतील तर त्याचीही रेलचेल आहे. श्री राममंगलदास सद्गुरु मंदिर, स्वामी कविंद्र परमानंद यांची समाधी, नरवीर तानजी मालुसरे यांचे जन्मगाव उमरठ, कांगोरीगड आदी ठिकाणांना आपणास भेटी देता येतील.
 

थोडक्यात प्रदुषणविरहीत स्वच्छ हवा, ऊन्-पावसाचा चालणार पाठशिवणीचा खेळ आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर शनिवार रविवार दोन दिवस पोलादपुरला जाण्याचा बेत आखणे आपणास स्वर्गीय सुखाचा आनंद देणारे ठरेल. पोलादपूरला कसे जायचे? कोकणात जाणार्‍या सार्‍या गाड्या व्हाया पोलादपूरच जातात बरं का?

- एस. एम. देशमुख