अष्टविनायकांपैकी महडचा वरदविनायक

अष्टविनायकांपैकी श्री वरदविनायकाचे स्थान महड येथे आहे. खालापूरपासून ३ किलोमीटर आणि खोपोलीपासून सात अंतरावर मुंबई पुणे महामार्गावर महड हे गाव वसले आहे.

अष्टविनायकांपैकी महडचा वरदविनायक

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महामार्गापासून आत एक किलोमीटर अंतरावर वरदविनायकाचे मंदिर आहे. गृत्समद ऋषींनी वारदविनायकाची स्थापना केली अशी आख्यायिका आहे.

वाचक्नवी ऋषींची पत्नी मुकुंदा रुक्मागंद नावाच्या राजपुत्रावर आरक्त झाली व तिने रुक्मांगदाला तसे सांगितले मात्र रुक्मांगदाने नकार दिल्यानं ती संतप्त झाली आणि तिनं रुक्मांगदाला कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. देखणा रुक्मांगद कुरुप झाला तरीही मुकुंदा रुक्मांगदासाठी आरक्त होतीच. तिला रुक्मांगदाखेरीज काही सुचेना. मुकुंदाच्या या मनोवस्थतेचा फायदा घेत इंद्रानं रुक्मांगदाचं रुप धारण करुन मुकुंदेस भ्रष्ट केले. या संबंधातून मुकुंदेस जो पत्र झाला तो गृत्समद.

आईच्या चारित्र्याबद्दल गृत्समदला माहिती झाल्यावर त्याने आईला कंटकी होशील असा शाप दिला आणि पापमुक्तीसाठी तपश्चर्येसाठी पुष्पकवनात जाऊन बसला. त्याने विनायकाची घोर तपश्चर्या केली. विनायक प्रसन्न झाले आणि रिद्धी-सिद्धीसह त्याच्यापुढे येऊन उभे ठाकले. गृत्समदाला हवा तो वर मागायला सांगितले. गृत्समद म्हणाला हे विनायका, तू याच वनात राहून भक्तांची इच्छा पूर्ण कर. विनायकांनं तथास्तु म्हटलं. विनायकानं ज्या वनात वास्तव्य केलं ते पुष्पकवन म्हणजेच आजचे महड.

श्री वरदविनायकाच्या मूर्तीसंबंधीदेखील एक आख्यायिका आहे. पौंडर नावाच्या एका गणेशभक्ताला दृष्टांत होऊन १६९० साली मंदिराच्या मागील तलावात गणेशाची मूर्ती सापडली. दगडी सिंहासनाधिष्ठित गणेशमूर्तीच्या दोन्ही बाजूस दोन गजराज कोरलेले आहेत. पुढे १७२५ मध्ये पेशव्यांचे सरसुभे बिवलकर यांनी तेथे देऊळ बांधले. भाद्रपद व माघ या दोन्ही महिन्यात शुक्ल प्रतिपदा ते पंचमीपर्यंत येथे गणेशोत्सव असतो.

मूळ मूर्ती जीर्ण झाल्यामुळे मध्यंतरी ती खाडीत विसर्जित करण्यात आली होती परंतु यावरुन बराच वाद झाल्यानंतर मूर्ती पुन्हा बाहेर काढण्यात आली. आता ती मूर्ती मंदिराच्या मागे असलेल्या दत्तमंदिराजवळ ठेवण्यात आली आहे. त्या जागी आता नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. वरदविनायकाची सेवा केल्यास तो निश्चित दर्शन देतो अशी धारणा आहे. श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येतात. आता येथे भाविकांसाठी धर्मशाळेची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पुणे महामार्गावरील खोपोली येथून महड येथे रिक्षानेही जाता येते.

सातवा गणपती राया 
महड गावचा मशहूर 
वरदविनायकाचं तिथं एक मंदिर 
मंदिर लई सादसूद जस कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी 
नक्षी नागाची कळसाच्या वर 
सपनात भक्ताला कळ
देवळाच्या मागं आहे तळ 
मूर्ती गणाची पाण्यात मिळ
त्यानं बांधलं तिथं देऊळ 
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती
वरदान विनायकाची पूजा कराया येती हो 
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा 
अष्टविनायका तुझा महिमा कसा

- एस. एम. देशमुख