श्री जगदीश्वर मंदिर - किल्ले रायगड

जगदीश्वर मंदिरास भव्य अशी आयताकृती तटबंदी असून तटबंदीची लांबी १५० फूट, रुंदी १५० फूट आणि उंची १० फूट आहे.

श्री जगदीश्वर मंदिर - किल्ले रायगड
श्री जगदीश्वर मंदिर - किल्ले रायगड

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील एक सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे श्री जगदीश्वर शिवमंदिर. समुद्रसपाटीपासून तब्बल ८८२ मीटर उंच अशा रायगड किल्ल्याच्या उत्तर दिशेस जगदीश्वर मंदिर असून हे मंदिर रायगड किल्ल्यावरील सर्वात भव्य असे देवालय आहे.

जगदीश्वर मंदिरास भव्य अशी आयताकृती तटबंदी असून तटबंदीची लांबी १५० फूट, रुंदी १५० फूट आणि उंची १० फूट आहे. 

मंदिराच्या तटबंदीत प्रवेश करण्यासाठी पश्चिम दिशेस एक प्रवेशद्वार असून त्याची उंची सहा फूट व रुंदी चार फूट आहे. याशिवाय पूर्वेस मंदिराच्या बाहेर जाण्यास महादरवाजा असून त्याची एकूण उंची २५ फूट आहे व प्रवेशमार्गाची उंची आठ फूट व रुंदी पाच फूट आहे. 

तटबंदीच्या मध्यभागी जगदीश्वराचे मंदिर असून मंदिराची लांबी ३५ फूट, रुंदी २५ फूट आणि उंची १८ फूट आहे. मंदिराच्या उत्तरेस व दक्षिणेस लहान दरवाजे असून मुख्य द्वार पूर्वेस आहे. 

मंदिरासमोर एक भव्य असा पाषाणी नंदी आहे मात्र त्याचे मुख भग्न झालेले आहे. असे असले तरी नंदीची मूर्ती इतकी सुरेख आहे की ती पाहून शिवकाळातील अज्ञात अशा शिल्पकारांसमोर नकळत हात जोडले जातात.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेश मूर्ती असून सभागृहाच्या जमिनीवर भव्य असे कूर्मशील्प आहे मात्र ते सुद्धा भग्न झालेले दिसून येते.

मंदिराच्या सभागृहातील भिंतीस लागून एक भव्य असे हनुमान शिल्प आहे. पूर्वी हे शिल्प तटबंदीच्या मागील दरवाजाने आत शिरल्यावर दिसून येत असे मात्र कालांतराने हे शिल्प मूळ मंदिरात ठेवले गेले असावे यावरुन परिसरात मारुतीचे देखील एखादे मंदिर असावे असे जाणवते.

जगदीश्वर मंदिराचा कळस हा एक संशोधनाचा विषय असून त्याची शैली हिंदू मंदिर स्थापत्याशी मेळ खात नाही यावरून एक कयास बांधला जाऊ शकतो की मूळ जगदीश्वर मंदिराच्या मूळ बांधकामाशी मुघलांच्या १६८९ ते १७३९ या पन्नास वर्षाच्या अमलात छेडखानी केली गेली असावी,

मंदिराच्या गर्भगृहात जगदीश्वराचे शिवलिंग आहे. जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणात एकूण दोन शिलालेख असून पहिला लेख जगदीश्वर मंदिराच्या दरवाज्याच्या उंबरठ्यावर आहे व त्यावर सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इटळकर ही वाक्य लिहिली आहेत.

दुसरा शिलालेख मंदिराच्या  तटबंदीमध्ये बसवण्यात आला आहे जो संस्कृत भाषेत आहे. 

श्री गणपतये नम: ।
प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया
श्रीमच्छत्रपते शिवस्यनृपते सिंहासने तिष्ठत:।
शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।।
वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ
स्तभे कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो
यावन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।२।

याचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे होतो. 

तीनही लोकांना आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद सिंहासनाधिश्वर श्रीमत छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ आंनद नाम संवत्सरे शुल्क पक्षाच्या एकादशी तिथीस आश्लेषा नक्षत्र असताना ज्योतिष शास्त्रात कीर्तिमान मानल्या गेलेल्या मुहूर्तावर ज्याच्या सभोवती मनोरे, गजशाळा, विहिरी, तळी, ऊंच राजवाडे आहेत अशा या वाणीस अवर्ण्य अशा रायगडावर हिरोजीने निर्माण केला असून तो यावतचंद्र पृथ्वीतलावर खुशाल नांदो.

या दोन्ही लेखांवरून सदर मंदिराचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार हिरोजी इंदुलकर यांनी करवून घेतले असल्याचे समजते.

जुन्या इतिहासकारांनी रायगड किल्ल्यास साक्षात कैलास पर्वताची उपमा दिली आहे त्यामुळे सह्याद्रीच्या या कैलास पर्वतावरील अर्थात दुर्गेश्वर रायगडावरील जगदीश्वर हे मंदिर प्रत्येकाने एकदातरी पाहायलाच हवे.

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press