अक्रोड - गुणधर्म व खाण्याचे फायदे

ड्रायफ्रूट्स मध्ये ज्याचे नाव अग्रणी आहे असे अक्रोड हे फळ आरोग्यासाठीही अनेक फायदे देणारे आहे. मूलतः अक्रोडची झाडे ही हिमालय, इराण, चीन अथवा उत्तर भारत या भागांत पाहावयास मिळतात. हल्ली या झाडांची लागवड बऱ्याच प्रमाणात होऊ लागली आहे.

अक्रोड - गुणधर्म व खाण्याचे फायदे
अक्रोड

ड्रायफ्रूट्स मध्ये ज्याचे नाव अग्रणी आहे असे अक्रोड हे फळ आरोग्यासाठीही अनेक फायदे देणारे आहे. मूलतः अक्रोडची झाडे ही हिमालय, इराण, चीन अथवा उत्तर भारत या भागांत पाहावयास मिळतात. हल्ली या झाडांची लागवड बऱ्याच प्रमाणात होऊ लागली आहे. 

अक्रोड ला संस्कृत भाषेत अक्षोट असे नाव आहे. इंग्रजीमध्ये यास वॉलनट असे म्हणतात. हिंदीत अखरोट, बंगालीत आखरोट तर लॅटिन मध्ये इल्युरायटिस ट्रायलोबा अशी अक्रोडची वेगवेगळी नावे आहेत.

विशेष म्हणजे आक्रोड हे झाड वाढल्यावरही फळे लगेच येत नाहीत. अक्रोड ची फळे येण्यास १-२ नव्हे तर तब्बल ३०-४० वर्षे जाऊ शकतात. ही फळे पेरू एवढी असतात. कच्च्या फळांचे लोणचे सुद्धा तयार केले जाते. अक्रोड हे गुणधर्माने गोड, थोडे आंबट, स्निग्ध, धातुवृद्धिकरणारे, उष्ण, कफ पित्त निर्माते व मलबंधक आहे.

आक्रोडच्या फळांचे तेल सुद्धा खाण्यासाठी किंवा जाळण्यासाठी वापरात आणले जाते. आक्रोडच्या फळांचे सेवन हे वात, क्षय, पित्त, वायू, हृद्रोग, रक्तदोष, रक्तवात आणि इतर दाह यांचा नाश करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

जर मूळव्याधीचा त्रास असेल तर अक्रोडाच्या तेलात कांकडा भिजवून जखमेच्या जागी ठेवला तर मूळव्याधीचा त्रास कमी होतो. निर्गुडी च्या रसासोबत अक्रोडाची साल उगाळून अंजन केल्यास अथवा नस्य केल्यास अपस्मारावर हितकारी ठरते. पोटात कृमी झाल्यास कच्च्या आक्रोडाचा रस करून तो प्यायला तर कृमी नष्ट होतात. स्त्रियांमध्ये दुधाची वाढ होण्याकरिता गव्हाचा रवा आणि आक्रोडाची पाने समभाग घेऊन त्यांच्या पुऱ्या गाईच्या तुपासोबत खाल्ल्यास दुधवाढ होऊ शकते.

असे आणि इतर अनेक फायदे आक्रोड हे फळ खाण्याचे आहेत. मात्र कुठलाही उपाय करताना तज्ज्ञ वैद्य अथवा डॉक्टर यांचा सल्ला घेऊनच तो करावा. कधीही स्वतःहून कुठलाही उपाय करावयास जाऊ नये कारण आपल्या शरीरास काही ऍलर्जी अथवा पथ्य असू शकतात त्यामुळे वर लिहिलेली माहिती ही केवळ ज्ञान मिळवण्याच्या अथवा मनोरंजाच्या दृष्टीनेच वाचावी ही विनंती.