संत मीराबाई - निःसीम कृष्णभक्तीचे प्रतीक
संत मीराबाईंची कृष्णभक्ती केव्हा सुरु झाली याविषयी एक कथा आहे, एक दिवस मेडते शहरात एक साधू आले होते जे जयमल्ल यांच्या घरी काही काळ उतरले होते. त्यांच्याकडे कृष्णाची एक अतिशय सुंदर अशी मूर्ती होती. ही मूर्ती लहानग्या मीराबाईंनी पहिला व पाहताक्षणीच त्या कृष्णभक्तीत तल्लीन झाल्या.

निःसीम कृष्णभक्तीचे प्रतीक म्हणून संत मीराबाई यांचे नाव घेतले जाते. संत मीराबाई यांचा जन्म १४९८ साली राजस्थानातील मेडते येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रतन सिंह राठोड असे होते. तत्कालीन साधनांत मीराबाई या बालपणापासूनच दिसावयास अतिशय सुंदर होत्या असे वर्णन करण्यात आले आहे.
संत मीराबाईंची कृष्णभक्ती केव्हा सुरु झाली याविषयी एक कथा आहे, एक दिवस मेडते शहरात एक साधू आले होते जे जयमल्ल यांच्या घरी काही काळ उतरले होते. त्यांच्याकडे कृष्णाची एक अतिशय सुंदर अशी मूर्ती होती. ही मूर्ती लहानग्या मीराबाईंनी पहिला व पाहताक्षणीच त्या कृष्णभक्तीत तल्लीन झाल्या. मीराबाईंनी ती मूर्ती साधुंकडे मागितली मात्र साधूंनी ती मूर्ती देण्यास सुरुवातीस नकार दिला.
मात्र त्याच रात्री एक चमत्कार असा घडला की साधूच्या स्वप्नात त्यास दृष्टांत होऊन ती कृष्णमूर्ती तू मीराबाईस दे असा संदेश देण्यात आला व साधूने दुसऱ्याच दिवशी ती कृष्णमूर्ती मीराबाईंकडे सोपवली.
मीराबाईंचे वय विवाहयोग्य झाल्यावर त्यांचा विवाह उदेपूरचा महाराणा कुंभ याच्याशी झाला. मात्र लग्न झाल्यावरही मीराबाई कृष्णभक्तीमध्येच कायम तल्लीन राहू लागल्या जे महाराणा कुंभ व त्याच्या घराण्यातील लोकांना आवडेनासे झाले. सर्वांनी मीराबाईंना प्रवृत्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला मात्र मीराबाई आपली निःसीम कृष्णभक्ती सोडत नाही हे पाहून त्यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांना घराबाहेर काढले.
अशाप्रकाचे संकट आल्यावर स्वतःच्या आप्तांकडूनही मीराबाईंनी वाईट वागणूक मिळाली. अनेकांनी तिचे पातिव्रत्य व ईश्वरभक्ती यांची कसोटी घेण्यासाठी त्यांना अतोनात त्रास दिला मात्र मीराबाई आपल्या कृष्णभक्तीपासून चित्तभरही विचलित झाल्या नाहीत.
कालांतराने तिच्या सासरच्या कुटुंबाने पुन्हा एकदा मीराबाईंनी समजावण्याचा प्रयत्न केला. प्रथम त्यांची नणंद त्यांना म्हणाली की तुम्ही कायम साधू संतांचा मेळा जमवून कृष्णभक्तीत लिन असता यामुळे तुमच्या माहेरची व आता सासरची मान झुकली आहे तेव्हा आता भजन पूजन व साधू संतांची संगत सोडून तुम्ही संसाराकडे लक्ष द्या. यावेळी मीराबाई नणंदेस म्हणाल्या की तुम्ही सासरी न जाता येथेच राहून देवाचे गुणगान करीत माझ्यासोबत रहा.
पुढे मीराबाईच्या सासूने सुद्धा त्याना उपदेश करण्याचा प्रयत्न केला मात्र मीराबाई त्यांना म्हणाल्या की 'फुईजी तुम्ही आता वृद्ध झाल्या आहात, परमेश्वराच्या भजनात आपला उर्वरित काळ व्यतीत करा आपण हा भवसागर तरुन जाल'
मीराबाईंच्या पतीस हे सर्व समजल्यावर त्याने संतप्त होऊन विषाचा प्याला मीराबाईंकडे पाठवला मात्र मीराबाईंनी हा प्याला सुद्धा पती सन्मानार्थ आनंदाने प्यायला मात्र कृष्णकृपेने मीराबाईंना काहीच बाधा झाली नाही.
यावेळी मात्र महाराणा कुंभास समजले की आपली पत्नी खरी पतिव्रता असून संतपदास पोहोचलेली साध्वी आहे यानंतर कुंभाने पुढे मीराबाईंना कृष्णभक्तीपासून बिलकुल रोखले नाही.
पुढे मीराबाई गोकुळ वृंदावन येथे गेल्या त्यावेळी तेथील महंत यांची भेट घेण्याचा विचार त्यांनी केला मात्र आपण स्त्रियांची बेत घेत नाही असा निरोप त्याने पाठवला यावेळी मीराबाईंनी त्यांना सांगितले की 'अशा पवित्र क्षेत्री राहूनही तुम्ही स्त्री पुरुष असा भेद ठेवत आहात, तुमचे विचार ऐकून मी खरच धन्य झाले' हे ऐकून महंत ओशाळले व त्यांनी मीराबाईंनी भेट घेतली व कृष्णभक्तीविषयी दीर्घ चर्चा केली.
गोकुळ वृंदावनास गेलेल्या मीराबाईंनी चितोड येथे येऊन तिथेच राहावे व येथे कृष्णभक्तीमध्ये आपला वेळ घालवावा यासाठी राणा कुंभ याने खूप प्रयत्न केले मात्र मीराबाईंनी ही विनंती मानली नाही उलट आपणच राजपदाचा त्याग करून ईश्वरभक्तीत माझ्यासोबत वेळ घालवावा असे त्यांनी पतीस कळवले.
यानंतर मीराबाई द्वारका येथे निघून गेल्या व तेथे त्यांनी आपला उर्वरित काळ कृष्णभक्तीचा अनुयाय व प्रसार करण्यात व्यतीत केला. १५४७ साली त्यांचे द्वारका येथेच निधन झाले व त्यावेळी त्यांचे वय ४९ असावे.
मीराबाई या संत होत्याच मात्र त्या एक उत्तम कवियत्री सुद्धा होत्या. त्यांच्या कवितांच्या पदाच्या शेवटी 'मीरा के प्रभू गिरीधर नागर' असे पालुपद असे. आपल्या निःसीम भक्तीने, पातिव्रत्याने व कवित्वाने मीराबाईंनी संतमंडळात महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |