मकर संक्रांत - नवचैतन्याचा उत्सव

मकर संक्रांती पासून पृथ्वीस सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात मिळू लागतो व समस्त सृष्टीस गरजेचा असलेला सूर्यप्रकाश अधीक प्रमाणात मिळाल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण होते. 

मकर संक्रांत - नवचैतन्याचा उत्सव
मकर संक्रांत - नवचैतन्याचा उत्सव

भारतीय संस्कृतीस सणांची महान परंपरा आहे व प्रत्येक सणांमागे एक विचार व इतिहास आहे. भारतातल्या अशाच प्रसिद्ध सणांपैकी एक सण म्हणजे मकर संक्रांत. 

मकर संक्रांत हा दिवाळीनंतर येणारा हिंदूंचा एक अतिशय महत्वाचा सण. मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो. सृष्टीला प्रकाश व चैतन्य देणाऱ्या सूर्याची जी प्रमुख आयने आहेत ती दक्षिणायन व उत्तरायण या नावाने ओळखली जातात.

मकरसंक्रांत हा सण सूर्याचा ज्या दिवसापासून उत्तरायणाकडे प्रवास सुरु होतो त्या दिवसाच्या प्रारंभी असतो. या दिवसापासून दिवस मोठा व रात्र छोटी होऊ लागते व याच दिवशी सूर्याचा बारा राशींपैकी एक अशा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांत म्हटले जाते.

मकर संक्रांतीचे मुख्य वैशिट्य म्हणजे इतर सणांची तारीख भारतीय व इंग्रजी कालगणना यांच्यानुसार सारखी बदलत असली तरी मकर संक्रांत ही दर वर्षी १४ जानेवारी याच तारखेला येते.

मकर संक्रांती पासून पृथ्वीस सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात मिळू लागतो व समस्त सृष्टीस गरजेचा असलेला सूर्यप्रकाश अधीक प्रमाणात मिळाल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण होते. 

मकर संक्रांतीचे पौराणिक महत्व असेही हे की या दिवशी संक्रांति देवीने संकरासूर नामक असुराचा वध केला त्यामुळे या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान करण्याची परंपरा आहे व या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान केल्याने सद्गती मिळते अशी धारणा आहे.

मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे व आधीपासूनच घराघरात गृहिणी तिळगुळ तयार करून मकर संक्रांतीच्या दिवशी घरोघरी जाऊन एकमेकांना तिळगुळ दिले जाते व तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हटले जाते.

या दिवशी तीळ गूळ देण्याचे कारण म्हणजे या दिवसापासून दिवस तीळ तीळ मोठा होऊ लागतो त्यामुळे या काळात मनातील द्वेषभाव दूर करून पुन्हा एकदा नव्याने नात्यात गोडवा आणण्याचे काम करणे चांगले असते.

आपल्याकडे सध्या जी ग्रिटिंग्जस अर्थात शुभसंदेश पाठवण्याची परंपरा आहे तिची सुरुवात सुद्धा याच सणापासून झाली असे म्हणतात. पूर्वी या दिवशी कागदावर वेगवेगळ्या कलाकृती काढून एकमेकांना शुभसंदेश पाठवले जात असत.

मकरसंक्रातीच्या दिवशी आकाशात पतंग उडवण्याची सुद्धा परंपरा आहे व ही परंपरा भारताचं नव्हे तर पाकिस्तानसारख्या देशातही दिसून येते. खऱ्या अर्थी मकरसंक्रात हा आयुष्यात नवा व सकारात्मक बदल करण्याचा सण आहे.