कोमागाता मारू - भारत कॅनडा संघर्षाची पहिली घटना

त्याकाळी कॅनडा येथे जाताना जहाज हॉंगकॉंग आणि टोकियो आदी भाग करून कॅनडा येथे जात असे. मात्र कोमागाता मारू हे जहाज थेट कॅनडा येथे च्या बंदरावर जाऊन पोहोचले आणि तेथे तब्बल तीन ते चार महिने उभे राहिले.

कोमागाता मारू - भारत कॅनडा संघर्षाची पहिली घटना
कोमागाता मारू - भारत कॅनडा संघर्षाची पहिली घटना

भारत कॅनडा संबंधात गेल्या काही दिवसांत तणावाचे वातावरण दिसून येते मात्र अदमासे नऊशे वर्षांपूर्वी घडलेली एक घटना भारत कॅनडा संबंधांमधील बिघाडाची पहिली घटना मानावी लागेल व या लेखाच्या माध्यमातून या घटनेबद्दल माहिती घेऊ.

कॅनडा हा देश अमेरिका खंडातील एक मोठा देश व या ठिकाणी मूळ भारतीय वंशाच्या अनेक व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक झालेल्या आहेत व गेली अनेक वर्षे कॅनडा देशाचे नागरिक होण्याचे प्रमाण वाढले आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सुद्धा अनेक भारतीय नागरिक कॅनडामध्ये वास्तव्यास होते मात्र तेथील तत्कालीन राज्यकर्त्यांना भारतीयांचे कॅनडा देशात वाढणारे प्रमाण पाहून चिंता निर्माण झाली आणि १९१४ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी कॅनडाच्या प्रिव्ही कौन्सिलने एक फतवा काढून ही घोषणा केली की यापुढे भारतीयांना कॅनडा मध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही फक्त जी भारतीय लोक यापूर्वी कॅनडा मध्ये स्थायिक झाली आहेत त्यांनाच येथे राहता अथवा प्रवेश घेता येईल.

तो काळ असा होता की त्यावेळी थेट भारतातून कॅनडा येथे कुठलेच जहाज जात नसे. भारतीयांना वेगवेगळ्या मार्गाने कॅनडा मध्ये प्रवेश करावा लागत असे आणि कॅनडा मध्ये प्रवेश केल्यावर सुद्धा त्यांना अनेक संकटांचा आणि जाचाचा सामना करावा लागत असे कारण त्याकाळी भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. कॅनडात प्रवेश करणाऱ्या लोकांना आपल्या मुलांना अथवा बायकांना कॅनडामध्ये आणायची परवानगी सुद्धा मिळत नसे. 

कॅनडात त्याकाळी भारतासहित आजूबाजूच्या देशातील नागरिक जात असले तरी यामध्ये शिखांचे प्रमाण अधिक होते व आधीच कॅनडाच्या जाचामुळे संतप्त झालेल्या शीख बांधवांच्या रागात या घटनेने अधिकच भर पडली आणि १९१४ साली बाबा गुरुदत्तसिंग या साहसी शिखाने कॅनडा विरोधात बंड पुकारून कोमागाता मारू नामक एक जहाज कॅनडा येथे जाण्यासाठी भाड्याने घेतले आणि त्यामध्ये सहाशे शीख बसले.

त्याकाळी कॅनडा येथे जाताना जहाज हॉंगकॉंग आणि टोकियो आदी भाग करून कॅनडा येथे जात असे. मात्र कोमागाता मारू हे जहाज थेट कॅनडा येथे च्या बंदरावर जाऊन पोहोचले आणि तेथे तब्बल तीन ते चार महिने उभे राहिले.

परिस्थिती अशी झाली की कॅनडाने या जहाजास कॅनडा मध्ये प्रवेश करू दिला नाही आणि या जहाजातील भारतीय वीर बिलकुल मागे हटले नाहीत यावरून कॅनडा ने आपली सेना या ठिकाणी मागवली आणि जहाजातील वीर आणि कॅनडा ची सेना यांच्यात संघर्षाचे अनेक प्रसंग उद्भवले.

तब्बल तीन ते चार महिन्यांच्या या कालावधीत जहाजातील भारतीयांना अनेक यातनांचा सामना करावा लागला. जहाजातील अन्न पाणी सुद्धा संपले आणि यात्रेकरूंचे हाल अधिकच वाढले. अखेरीस भारतातील शासनाच्या हस्तक्षेपाने या जहाजास कॅनडा वरून भारतात पुन्हा परतावे लागले.

भारतात आल्यावर जहाजातील शिखांना ही आज्ञा दिली गेली की जहाजातून उतरून रेल्वेगाडी पकडून थेट पंजाबला निघून जावे मात्र जहाजातील शिखांना पंजाबला परतण्यापूर्वी सरकारला एक मागणी पाठवायची होती मात्र भारतातील तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांचे काही एक ऐकले नाही आणि त्यांना जबरदस्ती पंजाबला पाठवून दिले यावेळी भारतीय वीरांवर गोळीबार झाला यामध्ये ७५ हुन अधिक वीर मारले गेले.

यावेळी बाबा गुरुदत्तसिंग जहाजातून अज्ञातवासात गेले कारण त्यांच्याविरोधात अटक वॉरंट होते. बाबा गुरुदत्तसिंग तब्बल सात वर्षे वेष बदलून इंग्रजांच्या नजरेपासून दूर होते आणि याकाळात पोलीस गुप्तवेशात त्यांचा शोध घेत होते.

१६२१ सालच्या नोव्हेंबर महिन्यात बाबा गुरुदत्तसिंग यांनी महात्मा गांधींची भेट घेतली व यावेळी गांधीजी यांनी त्यांना पोलिसांना शरण जाण्याचा सल्ला दिला. गांधीजी यांचा सल्ला ऐकून बाबा गुरुदत्तसिंग हे पोलिसांना शरण गेले व त्यांना अटक झाली. २८ फेब्रुवारी १६२२ मध्ये लाहोर जेलमधून बाबा गुरुदत्तसिंग यांची सुटका झाली.

सुटका झाल्यावर त्यांनी कलकत्ता येथून तत्कालीन ब्रिटिश सरकारवर काही लाख रुपये नुकसान भरपाईचा दावा ठोकला मात्र तो कोर्टामार्फत बेदखल करण्यात आला. असे असले तरी बाबा गुरुदत्तसिंग आणि त्यांच्यासोबत असलेले ६०० शीख वीर यांनी कॅनडात भारतीयांविरोधात होणाऱ्या अन्यायाविरोधात बंड उभारले ते एकाअर्थी स्वातंत्र्य युद्धाचेच रूप होते व सध्याच्या भारत कॅनडा संघर्षाच्या काळात या घटनेची आवर्जून आठवण होणे गरजेचे आहे.