श्री तुकाई देवी मंदिर - कोंढणपूर

कोंढणपूर येथील श्री तुकाई देवी ही तुळजापूरच्या श्री भवानी मातेची थोरली बहीण असल्याने हे मंदिर भाविकांसाठी तीर्थक्षेत्र आहे.

श्री तुकाई देवी मंदिर - कोंढणपूर
श्री तुकाई देवी मंदिर - कोंढणपूर

सिंहगड किल्ल्याच्या आसमंतात असलेले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेले पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील कोंढणपूर या ऐतिहासिक वारसा असलेल्या गावाचे मुख्य आकर्षण आहे श्री तुकाई देवीचे मंदिर. 

भव्य अशा तुकाई देवी मंदिराच्या प्रांगणात ऐतिहासिक घटनांचे चित्रण असलेल्या वीरगळी पहावयास मिळतात. 

मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक भव्य घंटा आणि देवीचे वाहन असलेला सिंह पाहावयास मिळतो. 

गर्भगृहाच्या दरवाजास चांदीचे सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते.  

मंदिराचे गर्भगृह सुद्धा अतिशय भव्य असून मध्यभागी श्री तुकाई देवीची मूर्ती स्थानापन्न आहे. 

कोंढणपूर येथील श्री तुकाई देवी ही तुळजापूरच्या श्री भवानी मातेची थोरली बहीण असल्याने हे मंदिर भाविकांसाठी तीर्थक्षेत्र आहे.  

मंदिराच्या गाभार्‍यात असलेल्या देवळ्यांमध्ये  गणेश व नाग यांच्या मूर्ती आहेत.  

मंदिराचा बाह्यभाग सुद्धा प्रशस्त असून चारही बाजूंनी पाषाणांनी वेष्टित अशा भिंती आहेत. 

तुकाई देवी मंदिराची वास्तुशैली हेमाडपंती असून मंदिराचा कळस हा मराठेकालीन असावा. 

मंदिराच्या कळसावर विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या पाहावयास मिळतात. 

पौष महिन्यात देवीची मोठी यात्रा भरते व ही यात्रा महिनाभर सुरु असते. 

यात्रेस दूरदूरहून भाविक मनोभावे देवीचे दर्शन घेण्यात येत असतात.  

याशिवाय नवरात्र काळात मंदिरात देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.  

मंदिराच्या प्रांगणात इतर काही देवतांची मंदिरे, दीपमाळ आणि तुळशी वृंदावन पाहावयास मिळतात. 

तुळजापूरच्या श्री भवानी मातेची थोरली बहीण व समस्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री तुकाई मातेचे मंदिर एकदा तरी पाहायला हवे.