श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर - विठ्ठलवाडी हिंगणे पुणे

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलानजीक हे मंदिर असून या मंदिराची निर्मिती एकशे बावीस वर्षांपूर्वी दगडू महादजी फेंगसे यांनी केली होती. 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर - विठ्ठलवाडी हिंगणे पुणे
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर - विठ्ठलवाडी हिंगणे पुणे

पुण्यातील हिंगणे येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे.  

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलानजीक हे मंदिर असून या मंदिराची निर्मिती एकशे बावीस वर्षांपूर्वी दगडू महादजी फेंगसे यांनी केली होती. 

विठ्ठल रखुमाई मंदिरामुळे या परिसरास विठ्ठल वाडी या नावाने सुद्धा ओळखले जाते.

विठ्ठल रखुमाई मंदिराच्या स्थापत्य शैलीवर अठराव्या शतकातील वास्तुशैलीची छाप असून मंदिराचे बांधकाम अतिशय भव्य आहे. 

मंदिराच्या बांधकामात पाषाण व लाकडांचा वापर करण्यात आला असून अतिशय सुंदर कलाकुसर मंदिरात पहावयास मिळते. 

मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात विठ्ठल व रखुमाई यांच्या अत्यंत लोभसवाण्या मूर्ती पाहावयास मिळतात. 

१९६१ साली जेव्हा पानशेत धरण फुटून पुण्यात मोठा पूर आला होता त्यावेळी या मंदिरातही पाणी आले होते मात्र मंदिरास असलेल्या अभेद्य अशा संरक्षण भिंतीमुळे मंदिराचे फारसे नुकसान झाले नाही.  

पुण्याच्या विठ्ठलवाडीतील हे सुरेख असे धार्मिक स्थळ एकदातरी पहावयास हवे.