रामेश्वर मंदिर कायगांव

या मंदिरास रामेश्वर हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे येथील शिवलिंग हे खुद्द श्रीरामाने स्वहस्ते स्थापित केले आहे. 

रामेश्वर मंदिर कायगांव

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महाराष्ट्र राज्यात अद्वितीय स्थापत्यशैली असलेली अनेक मंदिरे आहेत व त्यापैकी एक मंदिर म्हणजे सध्याच्या अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर असलेल्या कायगाव येथील रामेश्वर हे प्राचीन शिवमंदिर.

कायगाव हे संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात असून या ठिकाणी गोदावरी व प्रवरा या दोन नद्यांचा संगम होतो.

या दोन नद्यांच्या संगमावर रामेश्वराचे हे प्राचीन शिवमंदिर आहे. 

या मंदिरास रामेश्वर हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे येथील शिवलिंग हे खुद्द श्रीरामाने स्वहस्ते स्थापित केले आहे. 

रामेश्वराचे मंदिर आकाराने फार मोठे नसले तरी त्याची स्थापत्यशैली अतिशय सुंदर असून सध्याच्या मंदिराची निर्मिती ही इसवी सनाच्या चौदाव्या शतकापूर्वीची असावी. 

मंदिराची रचना ही नंदी मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी आहे. 

नंदीमंडप आणि सभामंडपास घुमटाकृती कळस असून गर्भगृहास नक्षीदार असे उंच शिखर आहे.

नंदीमंडपात रेखीव असा नंदी असून जेव्हा आपण सभामंडपात प्रवेश करतो त्या वेळी त्याच्या शिखराची अंतर्गत रचना आपल्याला मोहित करते. 

सभामंडपाच्या लादीवर एक देखणे कूर्म शिल्पसुद्धा दिसून येते. 

सभामंडपातून जेव्हा आपण गर्भगृहात प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला समोर श्री रामेश्वराचे भव्य असे शिवलिंग दिसते व आपले हात आपोआप जोडले जातात.

गर्भगृहाच्या अंतर्भागाची रचना सुद्धा खूप सुंदर असून ती पाहून त्या काळातल्या शिल्पकारांची कलात्मकता दिसून येते. 

गर्भगृहाच्या द्वाराखाली असलेले किर्तीमुखाचे शिल्प सुद्धा अतिशय विलोभनीय असे आहे. 

मंदिराच्या आसपासचा निसर्ग आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जातो. 

श्रीरामाने या स्थळी कांचनमृगावर अंत्यसंस्कार केले असल्याने आजही दशक्रिया विधीसाठी गोदा प्रवरा संगमावरील हे स्थळ अतिशय पवित्र मानले जाते.
 
कायगाव येथील रामेश्वरमंदिर औरंगाबाद जिल्ह्याचे धार्मिक वैभव असून ते एकदातरी पाहायलाच हवे.