रायगड किल्ल्यावरील श्रीगोंदेश्वर महादेव मंदिर
कुशावर्त तलावाच्या वर श्रीगोंदेश्वर महादेव मंदिर असून हे मंदिर जगदीश्वर महादेवाच्या मंदिरा व्यतिरिक्त रायगड किल्ल्यावर असलेले दुसरे शिवमंदिर आहे.
राजधानी किल्ले रायगडावरील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे श्रीगोंदेश्वर महादेव मंदिर.
श्रीगोंदेश्वर मंदिर हे रायगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूस असून येथे येण्याचा मार्ग नगारखान्याच्या समोरून आहे.
नगारखान्याच्या समोरील रस्त्यावरून काही अंतर खाली आल्यावर आपल्याला श्रीगोंदेश्वर मंदिर, कुशावर्त तलाव आणि अष्टप्रधानांच्या वाड्यांच्या जोत्यांचे दर्शन होते.
कुशावर्त तलावाच्या वर श्रीगोंदेश्वर महादेव मंदिर असून हे मंदिर जगदीश्वर महादेवाच्या मंदिरा व्यतिरिक्त रायगड किल्ल्यावर असलेले दुसरे शिवमंदिर आहे.
पूर्वी या मंदिरास लाकडी सभागृह असावे मात्र सध्या ते दिसून येत नाही.
श्रीगोंदेश्वर मंदिर जगदीश्वराच्या मंदिराच्या तुलनेत आकाराने लहान असून एका चिरेबंदी पाषाणी जोत्यावर उभारण्यात आले आहे.
श्रीगोंदेश्वर मंदिराच्या गाभार्या बाहेर एक शिवलिंग व नंदी दिसून येतो.
गाभार्यात श्रीगोंदेश्वरचे शिवलिंग असून मागे तीन देवड्या दिसून येतात.
किल्ले रायगडावरील एक प्रसिद्ध तीर्थस्थान असलेले श्रीगोंदेश्वर मंदिर एकदा तरी पाहायला हवे.