पन्हाळा किल्ल्यावरील प्राचीन गुहा

पन्हाळा किल्ल्याचे प्राचीन काळात असलेले महत्त्व सिद्ध करणाऱ्या असंख्य अशा वास्तूंपैकी एक म्हणजे पन्हाळा किल्ल्यावरील मानवनिर्मित लेणी अर्थात गुहा.

पन्हाळा किल्ल्यावरील प्राचीन गुहा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्यास एक प्राचीन असा वारसा लाभला आहे. 

करवीर माहात्म्यात पन्हाळा किल्ल्यास पन्नगालय अर्थात नागांचे निवासस्थान असे म्हटले गेले आहे.  

यास्तव पन्हाळा किल्ला परिसरात प्राचीन काळी नागपूजक समाजाचे वास्तव्य होते हे लक्षात येते.  

पन्हाळा किल्ल्याचा घेरा एवढा प्रचंड आहे की शहाजी महाराजांच्या काळातील कवी जयराम पिंड्ये यांनी या किल्ल्यास पर्नाळपर्वत अशी रास्त उपमा दिली होती. 

पन्हाळा किल्ल्याचे प्राचीन काळात असलेले महत्त्व सिद्ध करणाऱ्या असंख्य अशा वास्तूंपैकी एक म्हणजे पन्हाळा किल्ल्यावरील मानवनिर्मित लेणी अर्थात गुहा.

या लेण्यांची निर्मिती सुद्धा किल्ल्याच्या आद्य रहिवाशांनीच केली असावी. 

पन्हाळा किल्ल्यावर अशा वीसहून अधिक लेण्या आहेत असे म्हटले जाते.

खडक खोदून निर्माण करण्यात आलेली ही लेणी किल्ल्यावरील मानवाच्या प्राचीन निवासाच्या द्योतक आहेत. 

या लेण्यांच्या परिसरातच हनुमानाचे एक अत्यंत सुंदर व चिरेबंदी देवालय आहे ज्याची स्थापत्यशैली अद्वितीय आहे. 

पन्हाळा किल्ल्यास भेट देणाऱ्यांनी ही लेणी व हनुमान मंदिर अवश्य पाहिलेच पाहिजे.