झुंजार माची - किल्ले तोरणा उर्फ प्रचंडगड

तोरणा किल्ल्यावरील एकेकाळी शत्रूच्या उरात धडकी भरवणारी झुंजार माची म्हणजे समस्त दुर्गप्रेमींचे आकर्षण आहे.

झुंजार माची - किल्ले तोरणा उर्फ प्रचंडगड
झुंजार माची - किल्ले तोरणा उर्फ प्रचंडगड

छत्रपती शिवाजी महाराजांनी बलदंड अशा तोरणा किल्ल्यावर विजयाचे तोरण बांधून स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली.

तोरणा उर्फ प्रचंडगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला असून त्याची उंची समुद्र सपाटी पासून चौदाशे मीटर आहे.  

तोरणा किल्ल्यावरील एकेकाळी शत्रूच्या उरात धडकी भरवणारी झुंजार माची म्हणजे समस्त दुर्गप्रेमींचे आकर्षण आहे.

झुंजार माचीस झुंजारमल माची या नावानेसुद्धा ओळखले जाते. 

एखादा झुंजार मल्ल आपले बाहू फैलावून प्रतिस्पर्ध्यास जसे आव्हान देतो तसेच झुंजार माचीचे स्वरूप आहे. 

झुंजारमाची ही तोरणा किल्ल्याची अत्यंत मजबूत व बळकट माची असून या माचीस एकाखाली एक असे दोन टप्पे आहेत.  

झुंजार माचीस चिलखती पद्धतीची तटबंदी व बुरुज असून त्यामुळे माचीची संरक्षण व्यवस्था अत्यंत बळकट झाली आहे. 

शत्रूवर नजर ठेवणे व युद्धप्रसंगी शत्रूवर मारा करणे यासाठी ही माची अतिशय महत्त्वाची होती. 

झुंजार माची चे मधोमध एक पाण्याचे टाके सुद्धा पाहावयास मिळते. 

झुंजार माचीवरून राजगड व सिंहगड या स्वराज्यातील दोन महत्वाच्या किल्ल्यांचे अत्यंत सुरेख दर्शन होते. 

तोरणा किल्ल्यास भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींनी झुंजार माची अवश्य पाहायलाच हवी.

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबईचा अज्ञात इतिहास  खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
दुर्ग महिमा महाराष्ट्राचा खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
दुर्ग स्थल महिमा खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा