किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड - प्राचीन वारसा असलेला दुर्ग
चावंडगडावरील एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचा समुह. या टाक्या संख्येने सात असून पाण्याने बारमाही भरलेल्या असतात.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात गडकोटांचा उज्ज्वल वारसा लाभला आहे व या शृंखलेतील एक दुर्ग म्हणजे चावंड.
चावंड किल्ला शिवकाळात प्रसन्नगड या नावाने सुद्धा ओळखला जात असे.
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चावंड या गावातून गडावर जाण्याचा मार्ग आहे.
गड चढताना पायवाटेचा टप्पा पार केल्यावर खडकात कोरलेल्या पायर्यांचा मार्ग सुरु होतो. या मार्गावर आधारासाठी लोखंडी रेलिंग आहेत ज्यांचा आधार घेऊन वर चढणे सोपे होते.
अखेरचा टप्पा चढून वर आल्यावर समोर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची गोमुखी रचना दिसून येते. नैसर्गिक कातळ व त्यावर पाषाण रचून प्रवेशद्वाराची संरचना अभेद्य करण्यात आली आहे.
प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या कातळावर एक गणेश प्रतिमा दिसून येते. अशीच एक गणेश प्रतिमा दरवाजावर सुद्धा कोरली गेलीआहे.
प्रवेशद्वार पार करून काही पायर्या चढून गेल्यावर आपला गडाच्या माथ्यावर प्रवेश होतो या ठिकाणाहून सह्याद्रीचे रौद्र रूप दिसून येते.
प्रवेशद्वाराच्या बुरुजावर प्रवेश केल्यावर एक छोटी तोफ दिसून येते.
येथून काही अंतरावर गडाच्या सदरचे जोते दिसून येते. सदरेच्या समोर गडावरील वाड्यांचे अवशेष दिसून येतात.
चावंड गडावर एक कोरीव पाषाणांनी युक्त असे शिवमंदिर असून हे मंदिर पाहून मंदिराच्या प्राचीन शिल्प वैभवाची प्रचीती येते.
मंदिराच्या बाजूस एक भव्य अशी चौकोनी पुष्करणी आहे. पुष्करणीच्या चोहोबाजूला असलेल्या भिंतींमध्ये अनेक कोनाडे असून काही कोनाड्यांमध्ये देवतांच्या मूर्ती दिसून येतात.
चावंडगडावरील एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचा समुह. या टाक्या संख्येने सात असून पाण्याने बारमाही भरलेल्या असतात.
गडावरील शिबंदीच्या पाण्याची सोय या टाक्यांतून होत असे.
गडावर कातळात कोरलेल्या अनेक भव्य आकाराच्या लेणी दिसून येतात. या लेण्यांचा वापर निवासासाठी अथवा साठवणुकीसाठी केला जात असावा.
गड फिरताना विविध ठिकाणी पाण्याची टाकी सुद्धा दिसून येतात.
गडावर गडदेवता चावण्डादेवीचे मंदिर आहे. चावण्डा देवी मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची सुरेख मूर्ती आहे. चावण्डा हे चामुंडा देवीचे दुसरे नाव असून किल्ल्याचे प्राचीन नाव चामुंडा असे असल्याचे उल्लेख जुन्या ग्रंथांत आढळतात.
प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचा साक्षीदार असलेला चावंड उर्फ प्रसन्नगडहा किल्ला एकदा तरी पाहायलाच हवा.