गंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान

गंगोत्री येथे जाण्याचा मार्गही पूर्वी अतिशय बिकट होता. या ठिकाणी जाणारा मार्ग वळणावळणांचा आणि अतिशय चढा होता.

गंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान
गंगोत्री

भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान संस्कृती होती व प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा मूळ पेशा हा शेतीचाच होता. कृषी असो वा मानवी जीवन दोन्ही पाण्यावाचून निष्फळ व यासाठी मनुष्याने जेव्हा गावे वसवली ती पाण्याचा स्रोत असणाऱ्या नद्यांजवळच आणि या नद्यांच्या आश्रयाने मानवी जीवन तरले व गेली लाखो वर्षे या नद्यांचं मानवी समाजाच्या जीवनाचा मुख्य स्रोत आहेत.

आपल्या भारतात हजारो नद्या आहेत व या नद्यांच्या तीरांवर मानवी जीवन स्थिरावले आहे. भारतातील सर्व नद्यांना आपण देवता मानतो व त्यामुळे या नद्यांना पौराणिक नावे आहेत व प्रत्येक नदीच्या उत्पत्तीमागे एक कथा आहे व या सर्व नद्यांमध्ये सर्वात पवित्र मानली जाणारी नदी म्हणजे गंगा. पुराणकाळात महापराक्रमी भगीरथ राजाने आपल्या पितरांचा उद्धार व्हावा यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि साक्षात स्वर्गलोकातून पवित्र गंगा नदी पृथ्वीवर अवतरली अशी कथा प्रसिद्ध आहे त्यामुळे गंगेलाच भगीरथी हे दुसरे नाव सुद्धा प्रचलित होते. 

गंगा नदीची लांबी तब्बल २,५२५ किलोमीटर एवढी लांब असून तिचा उगम उत्तराखंड राज्यातील गंगोत्री या ठिकाणी होती व तेथून ती आग्नेयेस वाहत जाते आणि भारताच्या उत्तर भागातील प्रदेश सुपीक करीत सध्याच्या बांग्लादेशमार्गे बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.

एक म्हण आपल्याकडे फार प्रचलित आहे व ती म्हणजे नदीचे मूळ आणि ऋषींचे कुळ शोधू नये व आजच्या आधुनिक युगात नदीचे मूळ शोधणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य झाले असले तरी मागील काही वर्षांपूर्वी ही अत्यंत कठीण गोष्ट होती तरी आपल्या ज्ञानी पूर्वजांनी त्याकाळीही आपल्या बुद्धीच्या बळावर अनेक शोध त्याकाळात लावले जे आजही लावता येणे शक्य होत नाही. या लेखात आपण गंगा नदीच्या उगमस्थानाविषयी जाणून घेऊ. 

भारत खंडाच्या वैभवात भर घालणाऱ्या भव्य अशा हिमालयात गंगा नदीचा उगम होतो. भारत देशाच्या उत्तराखंड या राज्यात रुद्रप्रयाग हा जिल्हा आहे व या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे केदारनाथ शिवमंदिर आहे. अतिशय प्राचीन अशा या मंदिराचे दुसरे वैशिट्य म्हणजे याच आसमंतात गंगा नदीचा उगम असून तो गंगोत्री या नावाने प्रसिद्ध आहे.

गंगोत्री येथून ज्या प्रवाहाने गंगा नदी वाहत येते तिला बाळगंगा या नावाने ओळखले जात असे व हिमालयातील दुर्गम अशा डोंगरदऱ्यांनी व बर्फाने युक्त अशा एका ठिकाणी गंगोत्री हे स्थान असून त्या ठिकाणी एक गायमुख आहे व या गायमुखातून गंगा नदीचा उगम होतो. या ठिकाणी जाण्याचा रस्ता हा अदमासे शंभर वर्षांपूर्वी तयार केला असला तरी त्यापूर्वी या ठिकाणी सामान्य मनुष्यास जाणे दुरापास्तच होते. फक्त सिद्ध पुरुषांनाच या ठिकाणी जाऊन गंगेच्या उगमाचे दर्शन घेणे शक्य असे त्यामुळे सामान्य माणसांना प्राचीन लोकांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथातूनच गंगेच्या उगमाची माहिती मिळत असे.

ज्यावेळी भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते त्यावेळी त्यांच्यातील काही संशोधकांनी गंगेच्या उगमाचा शोध घेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला मात्र त्यांना ते जमले नाही कारण संपूर्णपणे हिमाच्छादित प्रदेश आणि कधीही न विरघळणारा बर्फ असल्याने या ठिकाणी मनुष्य फार काळ तग धरू शकत नसे त्यामुळे भाविकांना त्याकाळी केदारनाथ व बाळगंगा या दोन स्थानाचे दर्शन प्राप्त होत असे आणि गंगोत्रीचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांस प्राप्त होत नसे.

बाळगंगेस जाण्याचा मार्गही पूर्वी अतिशय बिकट होता. या ठिकाणी जाणारा मार्ग वळणावळणांचा आणि अतिशय चढा होता. काही ठिकाणी हात टेकून वर जावे लागत असे. चालता चालता मध्येच तुटलेले उभे कडे लागत आणि या कड्यांच्या खडकात खांब अडकवून जिने करण्यात आले होते तेथून सरपटत पुढे जाणे भाग असे. बरेच अंतर कापल्यावर मनुष्य बाळगंगेस येथे पोहोचत असे.

जुन्या लोकांनी दुर्गम अशा गंगोत्रीचे वर्णन केले होते त्यानुसार बाळगंगेच्या वरील दिशेस जेथे रस्ता संपून हिमालयाचा बर्फाळ प्रदेश सुरु होतो तेथून काही अंतर गेल्यावर एक गोमुख दिसते व या ठिकाणी गंगेचा उगम असून त्यास गंगोत्री या नावाने सुद्धा ओळखतात. ब्रिटिश काळात म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात एक अधिकारी जुनी माहिती वाचून या ठिकाणी जाण्याचा निश्चय करून प्रयत्नांती तेथे पोहोचला व त्याने गंगेचा पवित्र उगम याची देही याची डोळा पाहिला.

त्याने या उगमाचे वर्णन करताना म्हटले आहे की, अतिशय परिश्रमांती मी गंगेच्या उगमापर्यंत जाऊन पोहोचलो. त्याठिकाणी मला एक बर्फाची गोठलेली उभी भिंत दिसली आणि त्या भिंतीखालून गंगेचा प्रवाह वाहत होता व तेथून पुढे असलेल्या एका गोमुखी कुंडातून बाहेर येत होता. जुन्या हिंदूंनी गंगेच्या उगमाची जी माहिती दिली आहे ती पूर्णपणे खरी आहे असे मला पटल्याचे त्याने आपल्या अनुभवात कथन केले आहे.

आधुनिक काळात गंगोत्री येथील उगमापाशी एक सुंदर मंदिर उभारण्यात आले असून वाहतुकीची सोय झाल्याने भाविक गंगा मातेच्या उगमाचे दर्शन घेण्यास मनोभावे येत असतात व भारताची जीवनदायिनी अशा या गंगेचे आभार मानत असतात.