कोंढाणेश्वर मंदिर - सिंहगड
सिंहगड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरील एका उंच अशा टेकडीवर कोंढाणेश्वर मंदिर स्थित आहे.

सिंहगड किल्ल्यावरील अगणित ऐतिहासिक स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे कोंढाणेश्वर मंदिर.
सिंहगड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरील एका उंच अशा टेकडीवर कोंढाणेश्वर मंदिर स्थित आहे.
मंदिराच्या समोर एक दीपमाळ व नंदीचे जीर्ण शिल्प दृष्टीस पडते.
दीपमाळेच्या समोर आपल्याला कोंढाणेश्वर मंदिर दिसून येते.
मंदिराच्या सभागृहात प्रवेश केल्यावर आपल्याला एक पाषाणी नंदी दिसून येतो.
पूर्वी मंदिराचे सभागृह लाकडी व पाषाणी बांधकामाने युक्त असावे मात्र सध्या सभागृहाच्या जोत्याचे अवशेष दिसून येतात.
मंदिराचे गर्भगृह सुस्थितीत असून प्रवेशद्वारावर द्वारशिल्पे दिसून येतात.
कोंढाणेश्वर मंदिर हे यादवकालीन असून गडाच्या स्थापनेपासून हे दैवत येथे असल्याचे सिंहगड किल्ल्याच्या कोंढाणा या मूळ नावावरून लक्षात येते.
मंदिराच्या गर्भगृहाचे दोन भाग असून पहिल्या भागात गणेशाची मूर्ती स्थानापन्न आहे.
मुख्य गर्भगृहाच्या दरवाज्यावर कोरीव नक्षीकाम असून गर्भगृहात कोंढाणेश्वर महादेवाचे शिवलिंग व मागील बाजूस दोन मूर्ती आणि देवाचा मुखवटा आहे.
गर्भगृहाच्या दरवाजावर आणि कळसाच्या अंतर्भागात अतिशय सुंदर असे कोरीवकाम दिसून येते.
सिंहगड उर्फ कोंढाणा किल्ल्याचे आदिदैवत असलेले कोंढाणेश्वर हे मंदिर एकदातरी पाहायलाच हवे.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |